esakal | ढेबेवाडी परिसरातील डोंगररांगांत फुलांचे रंगीबेरंगी गालीचे
sakal

बोलून बातमी शोधा

patan

पाऊस आणि पोषक वातावरणामुळे ढेबेवाडी परिसरातील डोंगररांगांत जणू फुलांचे रंगीबेरंगी गालीचेच पसरले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटकांना ही रंगीबेरंगी दुनिया प्रत्यक्ष पाहण्याचा मोह यंदा टाळावाच लागणार आहे. 

ढेबेवाडी परिसरातील डोंगररांगांत फुलांचे रंगीबेरंगी गालीचे

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : पाऊस आणि पोषक वातावरणामुळे परिसरातील डोंगररांगांत जणू फुलांचे रंगीबेरंगी गालीचेच पसरले आहेत. गेंद, पंद, कारवी, जांभळी मंजिरी, विविध प्रकारचा तेरडा, स्मिथिया, निळी आभाळी, हळूदा, जांभळी घंटा... कोणती म्हणून नावे सांगावी आणि ठेवावी अशीच काहीशी अवस्था निसर्गप्रेमी व अभ्यासकांची झाली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटकांना ही रंगीबेरंगी दुनिया प्रत्यक्ष पाहण्याचा मोह यंदा टाळावाच लागणार आहे. 

निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण असलेले ढेबेवाडी खोरे निसर्ग अभ्यासक व पर्यटकांना पूर्वीपासूनच खुणावत असले तरी भौगोलिक अडचणी आणि सुविधांची वानवा यामुळे तिथपर्यंत पोचणे सर्वांनाच शक्‍य होत नव्हते. सह्याद्री व्याघ्र राखीव व प्रादेशिक अशी येथील वनक्षेत्राची विभागणी झाली आहे. अलीकडे तेथे पर्यटनाला चांगली चालना मिळत असतानाच लॉकडाउनपासून प्रवेशबंदी कडक केल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. वाल्मीक पठारावरील सर्व चेकनाक्‍यांवर ये-जा करणारांची तपासणी सुरू असून स्थानिकांनाच प्रवेश देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

निसर्गसौंदर्यासह विविध प्रकारचे प्राणी-पक्षी व वृक्षसंपदेसाठी हा परिसर जसा परिचित आहे, तशीच पावसाळ्यात डोंगरपठारावर अवतरणाऱ्या फुलांच्या रंगीबेरंगी दुनियेबद्दलही त्याची वेगळी खासियत आहे. किती तरी प्रकारच्या फुलांनी ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत हा परिसर बहरतो. सध्याही तो बहरला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटकांना ही रंगीबेरंगी दुनिया प्रत्यक्ष पाहण्याचा मोह यंदा टाळावाच लागणार आहे. बाहेरील लोकांच्या गर्दी व हुल्लडबाजीमुळे समस्या वाढू नयेत यासाठी स्थानिक गावकऱ्यांकडूनही वन विभागाच्या यंत्रणेकडे प्रवेशबंदीसाठी आग्रह वाढताना दिसत आहे. 

वाल्मीक पठारावर पर्यटकांना प्रवेशबंदी 
अलीकडे तेथे पर्यटनाला चांगली चालना मिळत असतानाच लॉकडाउनपासून प्रवेशबंदी कडक केल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. वाल्मीक पठारावरील सर्व चेकनाक्‍यांवर ये-जा करणारांची तपासणी सुरू असून स्थानिकांनाच प्रवेश देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

संपादन ः संजय साळुंखे 
 

साताऱ्यात 1300 ऑक्‍सिजन बेडची आवश्यकता; उपचाराविना जातोय 20 रुग्णांचा जीव

loading image