esakal | 'ताे' विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

'ताे' विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत

विधानसभेच्या निकालानंतरच्या आज अखेर आमदार आनंदराव पाटील यांच्याबद्दल कार्यकर्त्यांसह कोणाहीही कसाही प्रश्न विचारला तरी नो कमेन्टस एवढेच उत्तर आमदार पृथ्वीराज चव्हाण देतात. त्यामुळे त्यांच्या नो कमेन्टेस मागे नक्की दडलय तरी काय?

'ताे' विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : कॉग्रेस पक्षाच्या जुन्या फळीतील नेते आणि पक्षाच्या विविध पदांवर काम करणारे आमदार आनंदराव पाटील यांच्या बद्दल कोणीही कधीही व कसाही प्रश्न विचारला तरी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नो कमेन्टस् असेच ढाचेबद्द आणि ठरलेले उत्तर असते. आनंदराव नानांचा मोठा गट फुटून बाजूला जातोय, याची जराही काळजी आमदार चव्हाण यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या गटासह विरोधकांच्या गटात आमदार चव्हाण यांच्या नो कमेन्टन्स अशी प्रतिक्रीये मागे नेमके दडलय काय, असा प्रश्न विचारला जातो आहे. आमदार पाटील यांच्या सगळ्याच हालचालीकडे पूर्ण दुल्रक्ष केले आहे. आमदार चव्हाण यांनी केलेला नजरअंदाज करण्यामागे नक्कीच त्यांची काहीतरी राजकीय व्यूव्हरचना आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अद्यापही कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.
कोरोनाच्या आणि अन्य बातम्या वाचा 

कॉग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सगळा कारभार आमदार आनंदराव पाटील यांच्या पुढाकाराने नेहमीच सांभाळला गेला. आमदार चव्हाण 1991 मध्ये पहिल्यांदा खासदारीकीच्या निवडणुकीस उभा होते. त्यावेळी आनंदराव पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. नेहमीच पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराची व सत्तेत असताना मतदार संघात त्यांची बाजू सांभाळण्याचे काम केले. आमदार आनंदराव पाटील यांना नेहमीच शॅडो पृथ्वीराज चव्हाण म्हणून ओळखले गेले. प्रमलाकाकी चव्हाण यांच्या काळातही आनंदराव पाटील यांनी काम केले. आनंदराव पाटील यांनी पक्षातील संघटनात्मक अनेक पदांवर काम केले. त्याला चव्हाण यांचा नेहमीच ग्रीन सिग्नल राहिला. त्यांना आमदारकीही त्याच प्रमाणपत्रावर बहाल करण्यात आली. त्यामुळे पाटील व चव्हाण यांची आघाडी कधी फुटणार नाही, विभाजीत होणार नाही, असा राजकीय लोकांचा अंदाज होता. मात्र 2019 मध्ये आक्रीत घडलं आणि आनंदराव पाटील यांचा गट पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावला. त्याची राज्यभर चर्चा झाली. विधानसभेच्या तोंडावर आनंदराव पाटील यांचे प्रताप व मानसिंग दोन्ही सुपूत्रांसह पुतणे सुनील पाटील यांनी भाजपमध्ये उडी घेतली. त्याला आमदार पाटील यांचा ग्रीन सिग्नल होता. त्यापूर्वी आमिदार पाटील यांनी मेळावा घेवून जाहीर बंड केले होते. त्यानंतरही त्यांनी भाजपशी सलगी वाढवली होती. त्यामुळे चव्हाण व पाटील यांच्यात दरी निर्माण झाली. 

विधानसभेच्या मोक्यातही आमदार पाटील यांनी गट सोडला होता. तरीही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटात मात्र शांतात होती. कोणीही त्यांच्या भुमिकेबद्दल काहीही मत व्यक्त करत नव्हते. त्यावेळा कोणी व आजही त्या गटाकडून काही मत व्यक्त होताना दिसत नाही. आमदार पाटील यांच्या कोणत्याही हालचालीवर कोणीही काहीही मत व्यक्त करू नये, अशा सुचना आमदार चव्हाण यांनी दिल्या आहेत, अशी आतील गोटातून समजते. विधानसभेच्या तोंडावर आमदार पाटील यांनी बंड केले होते. त्यावेळी केवळ नो कमेन्टस असे मोजकेच उत्तर देवून आमदार चव्हाण यांना वेळ मारून नेली. विधानसभेच्या निकालानंतरच्या आज अखेर आमदार पाटील यांच्याबद्दल कार्यकर्त्यांसह कोणाहीही कसाही प्रश्न विचारला तरी नो कमेन्टस एवढेच उत्तर आमदार चव्हाण देत आहेत. त्यामुळे त्यांच्या नो कमेन्टेस मागे नक्की दडलय तरी काय, अशी चर्चा आता त्यांच्या गटासह अन्य राजकीय पक्षातही सुरू आहे. आमदार पाटील यांच्यानंतर काय करायचे, त्याचा अजेंडा आमदार चव्हाण यांनी नक्की केला आहे. त्यामुळेच ते त्या सगळ्या हालचालीकडे दुर्लक्ष करत आहेत, असेही जाणकार सांगत आहेत. 

नो कमेन्ट्स् अन् स्मीत हास्यही 

आमदार पाटील यांनी बंडे केले आहे. त्याबाबत प्रश्न विचारला नो कमेन्टस् असे उत्तर आमदार चव्हाण देत आहेत. केवळ तेवढेच बोलून विषय सोडताहेत. मात्र त्याचवेळी त्या वाक्यासोबत आणदार चव्हाण स्मित हास्यही बरेच काही सांगून जाते. त्यामुले आमदार पाटील गटाला वगळून पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा भक्कम प्रवास सुरू राहणार आहे, हाच आत्मविश्वासही त्या हास्यामागे आहे, असे आमदार चव्हाण यांचे निकटवर्तीयांचे सांगताहेत.

दर कमी झाले तरी आले क्षेत्रात वाढ, तज्ज्ञांचे मत 

तारळीच्या पाण्याअभावी शेतकरी चिंतेत, अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव

जावळीतील वहागांवच्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू; 337 जणांवर उपचार सुरु

लॉकडाऊननंतर उद्योजकांना वाढीव वीजबिलांचा शॉक!

...तरीही सातारी कंदी पेढ्याची चवच न्यारी

loading image
go to top