Satara : खंबाटकी घाटात कंटनेरला लागली आग, तीन कोटींचं नुकसान

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये दत्त मंदीर जवळ
fire
fire sakal

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये दत्त मंदीर जवळ आज दुपारी एक वाजता पुढील जाणारा मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात मागे एम .जी हेक्टर या महागडया गाड्या घेऊन जात असलेल्या कंटनेरला धडक दिल्याने डिझेल टाकी फुटुन कंटेनरने तत्काळ पेट घेतला . यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही . मात्र यामध्ये एकुण सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे .

दरम्यान पोलीस निरीक्षक महेश इंगळे, दत्तात्रय गुरव व प्रकाश घनवट यांनी घटना स्थळी सुत्रे हलवुन तत्काळ एशियन पेन्ट, वाई नगरपरिषद व भुईंज कारखान्याचे अग्निशामक बंब बोलावुन गाड्या विझवले . तर वहातुक बोगद्यामार्ग वळवली . या गाडया विझविण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागला आहे .

याबाबत मिळलेली माहिती अशी क कंटेनर गाडीक्रमांक N l 01AB1208 हे एमजी हेक्टर या सहा महागडया गाड्या घेऊन गुजरात मुंबई वरून हुबळी कर्नाटक येथे जात होता तर हरियाना गुडगाव वरून कपडयले बंडल घेऊन बंगलोर च्या दिशेने मालट्रक GJ27x6199 हा निघाला होता . यावेळी अयाज पठाण व शिवशक्ती क्रेन सव्हिस यांनी घटना स्थळी मदत केली . या वेळी पो नि महेश इंगळे, सहायक पो नि .दत्तात्रय गुरव, उपनिरीक्षक प्रकाश घनवट, पोवारर विजय पिसाळ तात्या फरांदे गणेश' सनस दत्ता दिघे . गोकुळ बोरसे सतिश पवार . मनोज गायकवाड अविनाश डेरे विजय बागल कचरे सपकाळ यांनी घटना स्थळी भेट देऊन प र स्थितीवर नियंत्रण मिळवले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com