esakal | सातारकर आठच्या आत घरात! संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठा बंद; पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

जिल्ह्याच्या विविध भागांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, सातारा, फलटण हॉटस्पॉट ठरत आहेत.

सातारकर आठच्या आत घरात! संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठा बंद; पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार काल सातारा शहरातील सर्व बाजारपेठा आणि व्यवहार रात्री आठच्या ठोक्‍याला बंद करत सातारकरांनी घर गाठले. यामुळे साताऱ्यातील गर्दीने गजबजून वाहणारे रस्ते, बाजारपेठा ओस पडल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या आवाहनास सातारकरांनी पहिल्याच दिवशी प्रतिसाद दिल्याने अनावश्‍यक वादाचे प्रसंग टळले. 

जिल्ह्याच्या विविध भागांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, सातारा, फलटण हॉटस्पॉट ठरत आहेत. राज्यभरातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेत राज्य शासनाने रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला. या आदेशाची अंमलबजावणी काल रात्रीपासून होणार असल्याने पोलिसांनी त्याची पूर्वसूचना नागरिकांना देणे सुरू केले. यानुसार सातारा शहर, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी वाहनांमधून नागरिक, दुकानदारांना त्याबाबतच्या सूचना करत फिरत होते. पोलिसांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सातच्या सुमारास आवरण्यास सुरुवात केली. रात्री आठच्या ठोक्‍याला सर्वच बाजारपेठा बंद झाल्याने रस्त्यावरील गर्दी रोडावली.

चिंताजनक! साताऱ्याला कोरोनाचा घट्ट विळखा; जिल्ह्यात 474 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह, 4 बाधितांचा मृत्यू

नागरिकांना रात्री आठनंतर आपल्या घरी पोचता यावे, यासाठी काहीवेळेची मुदत पोलिसांनी दिली होती. ही मुदत संपल्यानंतर मात्र पोलिसांनी शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवरील चौकात ठाण मांडत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करत चालकांची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या तपासणी, चौकशी सत्रामुळे रात्री नऊच्या सुमारास सर्वच रस्ते सामसुम झाले. यानंतर स्पीकरद्वारे नागरिकांना आवाहन करत पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहनांसह शहरातील रस्त्यांवरून संचलन केले. नागरिक, व्यापाऱ्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिल्याने पोलिसांवरील अनावश्‍यक ताण कमी झाला होता. गेल्या वर्षी याच काळात कडकडीत लॉकडाउन करण्यात आले होते. काल रात्रीपासून सुरू केलेल्या संचार आणि जमावबंदीमुळे त्याकाळातील आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. 

न विचारता शाळेतून बाहेर गेल्याने विद्यार्थ्याला शिक्षकांकडून जबर मारहाण; पाचगणीत ठाण्याचा विद्यार्थी गंभीर जखमी

सातारा-पंढरपूर महामार्गावरील शिंदेवाडीत फॅक्टरीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top