esakal | बिहारच्या युवकाची महाराष्ट्राच्या मुलीवर नजर; गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

crime news
बिहारच्या युवकाची महाराष्ट्राच्या मुलीवर नजर; गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : येथील एका युवतीला वारंवार मोबाईलवरून तुझ्याशी लग्न करायचे असे म्हणून, तसेच पाठलाग करून त्रास देणाऱ्या परप्रांतियावर शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अजय विश्वनाथ यादव (रा. एमआयडीसी, सातारा, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. 2020 ते 12 एप्रिल 2021 या कालावधीत मोबाईलवर कॉल करून मला तुझ्याशी लग्न करायचे असे तो म्हणत होता, तसेच सातत्याने पाठलाग करून युवतीला त्रास देत होता. 2 एप्रिलला ही युवती मेडिकलमध्ये औषधे घेत होती.

यावेळी अजय तेथे आला. त्याने पुन्हा लग्न करायचे आहे, असे सांगितले, तसेच लग्न केले नाहीस तर मी तुझा असाच पाठलाग करत राहीन, असा दम दिला. त्याला युवतीने प्रतिसाद दिला नाही. त्या वेळी त्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार मेचकर तपास करत आहेत.

शिवथरला सहा जणांकडून जबरदस्तीने दोघांकडून दोन लाखांचा ऐवज लंपास

सातारा : शिवथर (ता. सातारा) हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत मद्यपान करत बसलेल्या दोघांना कोयत्याच्या मुठीने मारहाण करत दोन लाखांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केल्याप्रकरणी दुचाकीवरून आलेल्या सहा अनोळखी व्यक्तींवर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अजित शिवाजी निकम (वय 43, मूळ रा. तडवळे संमत कोरेगाव, सध्या रा. रामडोह आळी, वाई) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (ता. 19) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

या वेळी निकम व त्यांचा मित्र अमित अशोक साबळे हे शिवथरच्या हद्दीतील धोम कालव्यानजीक मद्यपान करत बसले होते. त्या वेळी दोन दुचाकीवरून सहा युवक तेथे आले. त्यांनी निकम यांच्या डोक्‍यात कोयत्याची मूठ मारली, तर अमितला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी अमितच्या गळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी देत निकम यांच्याकडील 1 लाख 73 हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल व घड्याळ असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत त्यांनी काल तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तपास करत आहेत.

काळजी करु नका;गिर्याराेहक प्रियांकाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल; ठाकरे सरकारला मनसेचा इशारा