esakal | झोपडी पेटवून दिल्याने पिंप्रदला महिलेचा होरपळून मृत्यू; पाच जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Crime News

जमीन वहिवटण्याच्या कारणावरून पेटवून दिलेल्या झोपडीत पारधी समाजातील ज्येष्ठ महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पिंप्रद (ता. फलटण) येथे आज घडली.

झोपडी पेटवून दिल्याने पिंप्रदला महिलेचा होरपळून मृत्यू; पाच जणांवर गुन्हा

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : जमीन वहिवटण्याच्या कारणावरून पेटवून दिलेल्या झोपडीत पारधी समाजातील ज्येष्ठ महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पिंप्रद (ता. फलटण) येथे आज घडली. महुली तथा मौली झबझब पवार (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्रद येथील गावाच्या हद्दीत काल (ता. 10) रात्री 11 वाजता कुंडलिक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे, सुनील मोरे (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. पिंप्रद) या संशयितांनी आपापसात संगनमत करून कल्पना अशोक पवार (वय 45, रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) या महिलेने खरेदी केलेली जमीन वहिवाटू नये म्हणून या जमिनीमध्ये टाकलेली झोपडी संशयितांनी पेटवून दिली. या आगीत झोपडीत झोपलेल्या महुली यांचा होरपळून मृत्यू झाला. 

एका सिगारेटने केले कोटीचे नुकसान; साताऱ्यात पाच शिवशाही जळून खाक

महुली तथा मौली झबझब पवार हिचा खून करून जिवे मारण्याचे उद्देशाने लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी कल्पना अशोक पवार (वय 45, रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कुंडलिक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू मोरे, कुमार मोरे, सुनील मोरे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top