
पाचवड फाटा येथे उत्तर प्रदेशमधील गॅरेज व्यावसायिक राम प्रसाद व रवी यादव यांच्यात पाण्याची मोटर सुरु करण्यावरुन वादावादी झाली.
कऱ्हाड (जि. सातारा) : पाचवड फाटा (ता. कऱ्हाड) येथे किरकोळ वादातून गॅरेज व्यावसायिकांत झालेल्या वादातून एकास लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. रवी यादव (वय २४, रा. उत्तप्रदेश) असे संबंधित खून झालेल्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाचवड फाटा येथे उत्तर प्रदेशमधील गॅरेज व्यावसायिक राम प्रसाद व रवी यादव यांच्यात काल शुक्रवारी रात्री पाण्याची मोटर सुरु करण्यावरुन वादावादी झाली. त्याचे पर्यावसन मारमारीत झाले. त्यानंतर रवी यादव याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याची माहिती मिळताच तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
जावयाच्या आत्महत्येप्रकरणी म्हसवडच्या सासू-सासऱ्यांवर इस्लामपुरात गुन्हा
संपादन : बाळकृष्ण मधाळे