शेतातून जाणाऱ्या रस्त्यावरून जोरदार हाणामारी; शिवथरात 12 जणांवर गुन्हा

प्रवीण जाधव
Sunday, 17 January 2021

शिवथरात शेतातून येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून झालेल्या मारामारीप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात 12 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

सातारा : शिवथर (ता. सातारा) येथे शेतातून येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून झालेल्या मारामारीप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात 12 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. प्रशांत सुभाष साबळे (रा. शिवथर) यांच्या फिर्यादीनुसार रमेश दत्तात्रय साबळे, सुधीर दत्तात्रय साबळे, प्रदीप दत्तात्रय साबळे, राजेंद्र सुरेश साबळे, जीवन राजेंद्र साबळे, चेतन सुधीर साबळे (सर्व रा. शिवथर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

शुक्रवारी (ता. 15) सकाळी साडेआठच्या सुमारास ते शिवथर येथील अंबवळी शिवारात गेले होते. शेतातील सरबांधावरून जात असताना त्यांना संशयितांनी अडवत "सर बांधावरून जायचे नाही', असे सांगितले. त्याला नकार दिल्याने त्यांनी वाद घालून धक्काबुक्की करत दगडाने मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत. 

Good News : बहुचर्चित फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु; रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

दुसरी फिर्याद उर्मिला रमेश साबळे यांनी दिली आहे. त्यानुसार प्रशांत सुभाष साबळे, सूरज रमेश साबळे, तेजस रमेश साबळे, शुभम रमेश साबळे, प्रज्वळ राजेंद्र साबळे, निवास (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. शिवथर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवथर येथील अंबवळी शिवारात शिवथर ते मालगावकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर पती रमेश यांना जागेतून येण्या-जाण्यावरून संशयितांनी शिवीगाळ- दमदाटी करत काठीने मारहाण केली तसेच भांडणे सोडविण्यास गेलेले दीर प्रदीप, पुतण्या राजेंद्र व चेतन यांनाही त्यांनी धक्काबुक्की केल्याचे उर्मिला यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार बागवान तपास करत आहेत. 

जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपचे स्वतंत्र पॅनेल?; शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Crimes Against 12 Persons From Shivthar Registered At Satara Police Station