esakal | कऱ्हाडातील बुधवारपेठेत एकावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ल्यात एकजण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Crime News

कऱ्हाडातील मंगळवार पेठेतील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतच एकावर कोयत्याने हल्ला झाला आहे.

कऱ्हाडातील बुधवारपेठेत एकावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ल्यात एकजण जखमी

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील मंगळवार पेठेतील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतच एकावर कोयत्याने हल्ला झाला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. पांढरीच्या मारूती मंदिरासमोर रात्री सव्वा आठच्या सुमारास झालेल्या थरारक हल्ल्यात एकजण जखमी आहे. हल्ला त्वरित करणारे तेथून पसार झाले आहेत. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांचा नेमका उद्देशही व कारणही समजू शकले नाही. 

मिलींद कृष्णता शिंदे (वय 21, रा. बुधवार पेठ) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे, असे उपजिल्हा रूग्णालयातील विद्याकीय सूत्रांनी सांगितले. शिंदेच्या मानेवर वार झाला आहे, तो गंभीर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले आहेत. पांढरीच्या मारूती चौक परिसरात तणावाचे वातावरण आहे. 

शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; आमदार गोरेंचा सरकारला दम

हल्ल्यात जखमी झालेल्यांची ओळख पटली आहे. त्याचे मिलींद शिंदे असे त्याचे नाव आहे, असे उपजिल्हा वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याच्यावर हल्ला कोणी केला. त्यामागचे कारण काय होते, याची ओळख अद्याप पटलेली नव्हती. पांढरीच्या मारूती चोकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून हल्ला करणारे कोण होते, याची पोलिस चौकशी करत आहेत. मात्र, रात्रीपर्यंत त्यांच्या हाती काहीही लागले नव्हते. या घटनेची नोंद करण्याचे काम पोलिसात सुरू होते.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top