esakal | प्रेमीयुगुलांनो! तुम्हाला लुटणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड; सोलापूर, बारामतीतील सहा जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

शिरवळजवळील वीर धरण परिसरात प्रेमीयुगुलांना व पर्यटक नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले.

प्रेमीयुगुलांनो! तुम्हाला लुटणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड; सोलापूर, बारामतीतील सहा जणांना अटक

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : शिरवळजवळील वीर धरण परिसरात प्रेमीयुगुलांना व पर्यटक नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. पर्यटक म्हणून आलेल्या प्रेमीयुगुलांना व नागरिकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या सूचनेनुसार लुटमारीच्या घटनांना पायबंद घालण्याकरिता शिरवळ पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस अंमलदार रवींद्र कदम, जितेंद्र शिंदे, धीरज यादव, अमोल जगदाळे व स्वप्नील दौड यांचे पथक तयार करण्यात आले. 

या ठिकाणी गस्त घालताना परिसरामध्ये तोंडाला मास्क लावलेल्या अवस्थेत दुचाकीवर संशयितरीत्या युवक फिरताना आढळून आले. या वेळी पोलिसांनी हटकले असता ते पळाले. त्याचवेळेस शिरवळ पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरील महावीर सुखदेव खोमणे (वय 23, रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शाहरूख महमुलाल बक्षी (वय 24, मूळ गाव मार्डी, ता. माण सध्या रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), भैय्या हुसेन शेख (वय 25, रा. कांबळेश्वर, ता. बारामती, जि. पुणे) व 17 वर्षीय अल्पवयीन युवक या चौघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 13 इंच लांबीची कुकरी, 7.5 इंचांचा नक्षीदार चाकू अशी धातक शस्त्रे मिळून आली. 

शिवेंद्रसिंहराजेंच्या शब्दास मान; नगराध्यक्षांचा राजीनामा

अन्य दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असता लोणंदजवळ फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी लोणंद येथे मोठ्या शिताफीने अमीर मौल्लाली मुल्ला, (वय 21, रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व मयूर अंकुश कारंडे (वय 20 वर्ष, रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेत शिरवळ पोलिसांच्या स्वाधीन केले, असे सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आज खंडाळा न्यायालयात हजर केले असता सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी उदयनराजेंनी 'महाविकास'ला सूचविली उपाययाेजना 

टोमॅटोचे गाव म्हणून कोपर्डे हवेलीची बनू लागली ओळख 

पाटण तालुक्‍यात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने शेतात ओढून नेऊन अत्याचार; बिबीतील एकास दहा वर्षांची शिक्षा

बहिणीला त्रास देणाऱ्या युवकाचा साताऱ्यात दगडाने ठेचून खून; मृतदेह खंडोबा माळावर जाळला

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top