दहिवडी : मेडिकल आणि बझार फोडून दोन लाखांची चोरी

अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कटरच्या साहाय्याने मेडिकलचे शटर उचकटून काढले.
Crime
Crimesakal

दहिवडी : दहिवडी - गोंदवले रस्त्यालगत नुकतेच सुरु झालेल्या यशोधन मेडिकल आणि फार्मा डिस्ट्रीब्युटर्स व यशोधन बझार हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून बारा हजार रुपये रोख रक्कम व दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. (Satara Crime News)

याबाबतची माहिती अशी, अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कटरच्या साहाय्याने मेडिकलचे शटर उचकटून काढले. मेडिकल मधील सर्व फर्निचर काचेचे असल्यामुळे चोरट्यांनी मेडिकलमधील कपाटाच्या काचा फोडून अनेक जीवनावश्यक वस्तूंची चोरी केली. त्यानंतर मेडिकलमधील कॅश काउंटर मधील रोख रक्कम बारा हजार रुपये देखील लंपास केले.

Crime
पुण्यात MPSC उमेदवाराची आत्महत्या

मेडिकल आणि बाझार एकाच मालकाचे असल्यामुळे मेडिकल मधून बझारमध्ये जाण्यासाठी दरवाजा बनवण्यात आला होता. त्यामुळे चोरट्यांनी मेडिकल मधून बझार मध्ये प्रवेश करुन बझार मधील खाद्य तेलाचे डबे, तेलाच्या पिशव्या, किराणा माल यासोबतच टेबल खुर्च्या देखील गायब केल्या. दोन लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या मालाची चोरी झाल्याची माहिती मालक अमोल अनंतराव पोळ यांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वीच या मेडिकल आणि बझारचे उद्घाटन झाले होते. दहिवडी शहरापासून बाहेरच्या बाजूला हा व्यवसाय असल्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Crime
यूपीसह 5 राज्यांमध्ये निवडणूक रॅली, रोड शोवरील बंदी वाढवली

मागील पंधरा दिवसापासून दहिवडी शहरांमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. चोरटे सीसीटीव्ही मध्ये देखील दिसून आले आहेत. सततच्या चोऱ्यांमुळे शहरातील नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहे. तरी पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com