सातारा : अंगणवाडी सेविकांसह मदतनिसांची दिवाळी गोड

bonus
bonussakal

अंगणवाडी सेविकांसह मदतनिसांची दिवाळी गोड

सातारा ः छोट्या बालकांवर संस्कार करणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने तातडीने त्यांना दिवाळीची भेट दिली असून, जिल्ह्यातील एकूण आठ हजार १४४ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एक कोटी ६२ लाख ८८ हजार रुपयांची भाऊबीज देण्यात येत आहे.

bonus
बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांची बढती

जिल्ह्यात ३९३१ अंगणवाड्या व ८७९ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यावर आठ हजार १४४ सेविका आणि मदतनीस काम करतात. त्यांना शासनाकडून दरमहा मानधन दिले जाते. मात्र, तसे ते तटपुंजेच असते. अर्थात अनेक वेळा हे मानधनही त्यांना वेळेत मिळत नाही. बहुतेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सामान्य कुटुंबातील असतात. त्यांना वेळेत मानधन मिळण्याची गरज असते. यासाठी त्यांना कायम झगडावे लागते. शासनाच्या वतीने काही वर्षांपूर्वी भाऊबीज म्हणून फक्त ५०० रुपये दिले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दोन हजार रुपये भाऊबीज दिली जाते. अर्थांत ही भाऊबीज त्यांना कधीच दिवाळीत मिळत नव्हती. दिवाळी संपली तरी त्यांना अनेक महिने त्याची प्रतीक्षा करावी लागत असायची. मात्र, यावर्षी शासनाकडून निधी उपलब्ध होताच जिल्हा परिषदेतून काल दुपारी अंगणवाडी सेविकांसाठीचा भाऊबीज निधी एक कोटी ६२ लाख ८८ हजार रुपये ११ पंचायत समित्यांकडे पाठविण्यात आला असून, आज अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या बँक खात्यावर भाऊबीज जमा होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांनी समाधान व्यक्त केले.

"अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना दिवाळीतच भाऊबीज मिळाली तर त्यांना ती सणासाठी खूप उपयोगी पडेल, या उद्देशाने त्यांना भाऊबीज रक्कम लगेच मिळावी, अशी उपयायोजना शासनाने केली. त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहे.’’

- रोहिणी ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, सातारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com