कऱ्हाडातील काेराेना फायटर पॉझिटिव्ह; बनपुरीकर कॉलनी सील

कऱ्हाडातील काेराेना फायटर पॉझिटिव्ह; बनपुरीकर कॉलनी सील

कऱ्हाड : पार्ले येथील विलगीकरण कक्षात सेवा बजावणाऱ्या महिला डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह ठरली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या संबंधित महिला डॉक्‍टरने आठ ते 15 जूनअखेर पार्ले विलगीकरण कक्षात सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांची ड्युटी संपली होती. त्या घरीच क्वारंटाइन होत्या. त्या 16 ते 30 जूनअखेर क्वारंटाइन होणार होत्या. मात्र,29 जूनला त्यांना कशाचाही वास यायचा बंद झाला, चव लागत नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
 
पार्ले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये त्या महिला डॉक्‍टर म्हणून सेवा बाजावत होत्या. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. संबंधित महिला डॉक्‍टरांनी 8 ते 15 जून अशी ड्युटी केली होती. त्या 15 जूनपासून घरीच क्वारंटाइन होत्या. त्यांचे येथील एका कॉलनीत घर आहे. घरीच त्यांना क्वारंटाइन केले होते. मात्र, 29 जूनला त्यांना त्रास झाला. 30 जूनला त्यांना पदार्थांचा वास नेहमीप्रमाणे येत नव्हता, चव लागली नाही. वास कमी येत असल्याने त्या एक जूनला उपचारास दाखल झाल्या. त्यांचा त्याचदिवशी स्वॅब घेण्यात आला. त्यांचे घर येथील एका कॉलनीत आहे. त्या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत. त्या पार्लेतील ड्युटी संपल्यानंतर थेट घरीच क्वारंटाइन होत्या, अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णाची सेवा करताना कदाचित त्यांना इन्फेक्‍शन झाले असावे. प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. संबंधित महिला डॉक्‍टर येथील बनपुरीकर कॉलनीत राहतात. मात्र, त्या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत. तरीही त्या भागात सूक्ष्म कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या हातांना सलाम 

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची लाॅकडाउनची भूमिका जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com