अंगणवाड्यांत खिचडी नको हवा शिधा!, पालकांचा आग्रह

Satara
Satara

मायणी (जि. सातारा) : शालेय पोषण आहारअंतर्गत शाळांमधून दिली जाणारी खिचडी कोरोना काळात बंद झाली. त्याऐवजी तांदूळ, मूगडाळ व हरभरा असा कोरडा शिधा सध्या वितरण करण्यात येत आहे. त्याचे पालक व शाळा व्यवस्थापनाकडून स्वागत होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील तयार पोषण आहार व पूरक आहार बंद करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तयार आहाराऐवजी तांदूळ, मूगडाळ व हरभरा अशा धान्यादी मालाचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय, धंदे बंद पडले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांचे पालकही बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे कुटुंबीयांचे पालनपोषण करण्याची समस्या त्यांना सतावत आहे.

अशावेळी पोषण आहाराच्या माध्यमातून शाळेकडून मिळणाऱ्या धान्याचा पुरेपूर उपयोग परिवारासाठी होत आहे. गोरगरीब पालकांच्या संसाराला त्यामुळे हातभार लागत आहे. म्हणून पोषण आहाराचा कोरडा शिधा वितरित करण्याची मागणी पालक करत आहेत. त्याचबरोबर कोरडा शिधावाटपाचे शिक्षक व मुख्याध्यापकांकडूनही समर्थन होत आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी होणाऱ्या पोषण आहाराच्या काळ्या बाजारासह गैरव्यवहाराला पायबंद बसणार आहे.

अनेकदा खिचडी शिल्लक राहून वाया जाते. तेही आपोआप बंद होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही पोषण आहाराच्या खिचडीऐवजी कोरडा शिधा कायम वितरित करण्याची मागणी केली जात आहे. कोरडा शिधा घरी दिल्याने खिचडी शिजवण्यापासून, वितरण करणे, शिल्लक खिचडीची विल्हेवाट लावणे, स्वच्छता करणे, भाजण्याचा धोका अशा अनेक समस्येतून विद्यार्थी व शिक्षक मुक्त होणार आहेत, असे मत शिक्षक वर्ग व्यक्त करत आहेत. 


""शाळेत खिचडी न बनवता तांदूळ व इतर वस्तू घरी वितरित केल्यास शाळा, शिक्षक व पालकांचा सुसंवाद वाढण्यास मदत होईल.'' 
- दादासाहेब कचरे, 
माजी अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, मायणी 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com