esakal | साताऱ्यात 184 विद्यार्थी शिक्षणापासून 'वंचित'; जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणातून माहिती स्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

राज्य शासनाच्या आदेशानुसार एक ते दहा मार्च या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविली.

साताऱ्यात 184 विद्यार्थी शिक्षणापासून 'वंचित'; जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणातून माहिती स्पष्ट

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणातून 184 शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील 95 मुले, तर 89 मुली आढळून आल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. 

राज्य शासनाच्या आदेशानुसार एक ते दहा मार्च या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये खासगी, विनाअनुदानित, अनुदानित, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक सहभागी झाले होते. या शिक्षकांनी बांधकाम, पदपथ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, झोपटपट्टी परिसर, बांधकामांची ठिकाणे आदी ठिकाणी सर्व्हे केला. यावेळी शिक्षकांनी संबंधित विद्यार्थी शाळेपासून दूर जाण्याची कारणे जाणून घेतली. आर्थिक अडचणी, अपुरी कागदपत्रे, स्थलांतरित कुटुंबे, बालमजुरी, बालकामगार आदींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचे सर्व्हेदरम्यान शिक्षकांना आढळून आले. या सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील सुमारे आठ हजार शिक्षक सहभागी झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. 

बगाड मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा खंडित?; बावधनात यात्रांवर निर्बंध, जमावबंदी लागू
 
या सर्वेक्षणातून सर्वांत जास्त 41 शाळाबाह्य विद्यार्थी कऱ्हाड तालुक्‍यात आढळून आले आहेत. स्थलांतरित विद्यार्थ्यांची संख्या जावळी तालुक्‍यात 18, वाई तालुक्‍यात 11, महाबळेश्‍वर- 3, फलटण- 8, खंडाळा- 8, सातारा- 55, खटाव- 5, माण- 18, कोरेगाव- 49, कऱ्हाड- 22, पाटण तालुक्‍यात 29 आहे. बालकामगार म्हणून जिल्ह्यात एकाही बालकाची नोंद सर्वेक्षणातून झाली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातून परराज्यात गेलेल्या 53 बालकांचा समावेश असून 361 बालके परराज्यातून सातारा जिल्ह्यात आल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

महिलांना कोविडप्रमाणे महिला सुरक्षा कायद्याची लस द्या; डॉ. सविता मोहितेंची पोलिसांकडे मागणी

शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांची अभ्यासूवृत्ती असूनही काही अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहिल्याचे दिसून आले. 

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 

प्रत्येक गावांत राष्ट्रवादीसह शरद पवारांचे नेतृत्व बळकट करा; शिंदेंचे राज्यातील सरपंचांना आवाहन

महाविकासच्या बड्या नेत्यांचे फाेन टॅप; सरकार पाडण्यासाठी भाजपचे षडयंत्र, राष्ट्रवादीच्या नेत्याची शंका 

आमचं ठरलं! भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेच्या नावात करणार बदल; लक्ष्मण मानेंचा राेष 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top