वनवासमाची, मलकापूर पाठोपाठ हॉटस्पॉट म्हासोलीकरांना दिलासा

वनवासमाची, मलकापूर पाठोपाठ हॉटस्पॉट म्हासोलीकरांना दिलासा

कऱ्हाड : वनवासमाची, मलकापूरपाठोपाठ तालुक्यातील म्हासोली गाव हॉटस्पॉट बनले. एका पाठोपाठ एक रूग्ण सापडल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र म्हासोलीतील आठ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून आज (गुरुवार) टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवशी आठ रूग्ण घरी परतल्याने म्हासोलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

तालुक्यात वनवासमाची, मलकापूर येथे कोरोनाची साखळी आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत असतानाच म्हासोली येथे नव्याने कोरोना साखळी निर्माण झाली. त्यामुळे तालुका पुन्हा हादरला. कोरोना बाधीत रूग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागल्याने म्हासोली गाव अल्पावधीत हॉटस्पॉट बनले. १८ व १९ मे रोजी म्हासोली येथील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या निकट सहवासातील ५० वर्षीय पुरूष, १८ वर्षीय युवक, १६ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय मुलगा, ६२ वर्षीय वृद्ध गृहस्थ, ४८ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष व ३५ वर्षीय महिला अशा आठ रूग्णांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांचे स्वॅबची तपासणी करता सर्वजण पॉझिटिव्ह आढळून आले.
 
त्यांच्यावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सकडून उपचार केले.  नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे आठही रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये  ६८ रूग्णांना कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजअखेर 422 बाधित आढळले असून त्यापैकी 134 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडले आहे.

दरम्यान, आज डीस्चार्जवेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. विनायक राजे, तुषार कदम, नुतेश पिसे, विमलाकांत बाबर, रमेश माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आदींसह हॉस्पिटलचा  स्टाफ उपस्थित होता. 

कायद्याला न जुमानणारे निसर्गापुढे शरण!, तीव्र उन्हामुळे रस्त्यावर शुकशुकाट 

नऊ वर्षांच्या मुलीसह चौघे कोरोनामुक्‍त

अध्यक्ष व्हायचे असते तर सहा महिन्यापू्र्वीच झालो असतो : पृथ्वीराज चव्हाण

जावयानं लावला सासरवाडीच्या जिवाला घोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com