Satara : ग्रामपंचायतीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाची परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayats election

Satara : ग्रामपंचायतीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपद आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीची मुदत उद्या (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद झाल्याने इच्छुकांसमोर अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी आता निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी दिली असुन उद्या दोन डिसेबरला शेवटच्या दिवशी दुपारी तीन ऐवजी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती कऱ्हाडचे तहसीलदार विजय पवार यांनी आज दैनिक सकाळशी बोलताना दिली.

सध्या निवडणुक लागलल्या गावोगावी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (शुक्रवार) शेवटची तारीख आहे. त्यासाठी अनेक इ्च्छुकांनी यासाठी काल बुधवारची रात्र जागवून काढली. उमेदवार दोन दिवसापासून अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मात्र निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद पडल्याने कालपासून (बुधवारी) अनेक इच्छुकांची धावपळ सुरु होती. मुदतीच्या आत अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी कसोटी लागली होती. निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद झाल्याने इच्छुकांची मोठी गैरसोय झाली. राज्यभरातुन त्यासंदर्भात तक्रारी येवु लागल्या. त्याचा विचार करुन निवडणुक आयोगाने आता ग्रामपंचायतीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी दिली असुन उद्या दोन डिसेबरला शेवटच्या दिवशी दुपारी तीन ऐवजी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगीतले.