सातारा : नगरवाचनालयाची निवडणूक रद्द; नव्‍याने होणार निवडणूक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : नगरवाचनालयाची निवडणूक रद्द; नव्‍याने होणार निवडणूक जाहीर

सातारा : नगरवाचनालयाची निवडणूक रद्द; नव्‍याने होणार निवडणूक जाहीर

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

‌सातारा ः त्रुटी व अनियमितता असल्‍याच्‍या तक्रारीवरून सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगरवाचनालयाचे विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाच्या २०२१-२०२६ या कालावधीसाठीच्‍या पंचवार्षिक निवडणुकीचा जाहीर केलेला कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. याबाबतची तक्रार विजय मांडके यांनी केली होती. या वाचनालयाच्‍या कार्यकारिणीच्‍या निवडीसाठी आता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्‍याची माहितीही मांडके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मतदार यादीमधील त्रुटी, सदोष मतदार यादी, निवडणूक कार्यक्रम, छाननीनंतर अर्ज मागे घेण्याची मुदत, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा कालावधी हे सगळे सभासद मतदानांवर अन्याय करणारे, मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याच्या हरकतीचा अर्ज संस्थेचे आजीव सभासद विजय मांडके यांनी निवडणूक यंत्रणेकडे केला होता.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

या तक्रारी अर्जावरील सुनावणीनंतर नगरवाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्‍याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतला. विश्वस्त मंडळाच्या चार व कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी येत्या ता. २८ रोजी निवडणूक होणार होती. अर्ज छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थित होते. त्यासंदर्भातील लेखी अर्जही छाननीच्या वेळी उपस्थित असलेले उमेदवार सुहास राजेशिर्के व विजय मांडके यांनी दिला होता.

loading image
go to top