कांदाटी खोऱ्यात "यांच्या' त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांचा बांबू लागवडीकडे कल

Satara
Satara

कास (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यातील अतिदुर्गम, मागासलेल्या कांदाटी खोऱ्यामध्ये मूळ मातीशी नाळ घट्ट ठेवून स्थानिक भूमिपुत्र राहत आहेत. पारंपरिक शेती उत्पादन कमी झाले असून, जंगली प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागामार्फत झालेल्या मार्गदर्शनामुळे कांदाटी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी अनुदानित बांबू लागवडीचा पर्याय निवडला आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली असून, जांभूळ, करवंदे, कोकम तसेच अत्यंत उपयुक्त असलेल्या मानगा बांबू लागवड करण्यासाठी खास प्रशिक्षण घेऊन आलेले तंत्र कृषी अधिकारी आर. आर. देशपांडे यांनी शेतकऱ्यांना या लागवडीबाबत सविस्तर माहिती दिली. बांबू लागवडीसाठी 100 टक्के अनुदान असून, पावसाळ्यामध्ये 20 गुंठे ते पाच एकरांपर्यंत लागवड केल्यानंतर पाच वर्षांनी उत्पादन मिळते. ते पुढे 50 वर्षे सुरूच राहते. या बांबूंपासून साडी व इतर वस्त्र तसेच 20 फुटांपर्यंत हा बांबू भरीव असल्याने यापासून कलात्मक फर्निचर बनविण्यात येते.

सध्या आंबा व इतर फळ लागवड उत्पादन देणारे असले तरी बांबू लागवड ही भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्‍वर तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, मंडलाधिकारी नितीन पवार, सुजित शिंदे, सहायक महेश नलवडे, श्‍याम मेडके, मंगेश इंगळे, श्री. पार्टे यांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जावून उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी आरव गावचे शेतकरी रामचंद्र शिंदे, सुरेश पाटील, राजू ढेबे, चकदेव येथील संतोष जंगम, कृष्णा जाधव, विठ्ठल जाधव, रमेश मोरे, हेमचंद्र मोरे यांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे कृषी सहायक महेश नलवडे यांनी येथील शेतकऱ्यांना लॉकडाउन काळात मोफत शिधावाटप करून दिलासा दिला. 

कृषी विभागाबद्दल समाधान 

या भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शासकीय पातळीवर मदत देण्यासाठी गेली अनेक वर्षे शासनाचा कृषी विभाग या भागात सातत्याने काम करतो आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com