कऱ्हाड : रिहानाच्या खूनप्रकरणी पतीला पाच वर्षांची सक्तमजुरी

कऱ्हाड : रिहानाच्या खूनप्रकरणी पतीला पाच वर्षांची सक्तमजुरी

कऱ्हाड : पत्नीला गंभीर जखमी करून तिचा खून केल्याप्रकरणी पतीला दोषी धरून पाच वर्षे सक्तमजुरी व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. ए. आर. औटी यांनी सुनावली. यासीन दस्तगीर सुतार असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी दिली.

सरकारी वकिलांनी दिलेली माहिती अशी, येथील शनिवार पेठेत दरवेशी चाळीत राहणाऱ्या रिहाना यासीन सुतार (वय 27) यांच्या घरात घुसून पती यासीन दस्तगीर सुतार याने गैरकारणावरून पाच ऑगस्ट 2014 च्या मध्यरात्री रिहाना यांच्या डोक्‍यात व चेहऱ्यावर जखमा करून त्यांचा खून केला. खुनानंतर मोटरसायकलवरून पळून जाणाऱ्या यासीन यास शेजारी राहणाऱ्या नजीर पटेल यांनी पाहिले होते. या घटनेबाबत दस्तगीर उस्मान सुतार यांनी शहर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाची फिर्याद दिली होती. त्यानंतर तत्कालीन व सध्याचे वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या गुन्ह्याचा छडा लावत संशयित यासीन सुतार यास अटक केली. 

त्यानंतर 31 ऑक्‍टोबर 2014 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र विशेष न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे ऍड. शहा यांनी 16 साक्षीदार तपासले. नजीर पटेल, डॉ. डी. डी. जाधव व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक पाटील यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने खटल्यातील आरोपी यासीन सुतार यास पत्नीच्या खूनप्रकरणी दोषी धरून पाच वर्षे सक्तमजुरी व 30 हजारांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम रिहाना यांच्या मुलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गंभीर रुग्णांना इथं आणताय... मग हे नक्की वाचा

सदस्य भडकले, सीईओ माण पंचायत समितीचे मालक नाहीत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com