बुधवारची सकाळ 'या' जिल्ह्यात 48 कोरोना बाधितांनी उजाडली

बुधवार, 1 जुलै 2020

सातारा जिल्ह्यात दरराेज सरासरी 20 काेराेनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरत आहे.

सातारा :  सातारा जिल्ह्यात 48 काेराेना बाधितांची संख्या वाढली आहे. याबाबतची माहिती आज (बुधवार) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. डाॅ. गडीकर म्हणाले सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले पाच , सारी पाच, आय.एल.आय एक असे एकूण  48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित  आला आहे. 

यामध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणी नगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22,54,32,40,35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60,44 वर्षीय पुरुष, तुळसन येथील तीन वर्षाची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23,45,70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष. मलकापूर येथील 36, 34  वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती. पाटण तालुक्यातील नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकर वाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका. सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील 75 वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

याबराेबरच कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22,24,32,25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला. फलटण  तालुक्यातील कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष,  आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष. जावळी तालुक्यातील मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

शाब्बास... सातारकरांनी शोधला दुर्मिळ किटक