Satara: द्राक्ष उत्पादन यंदा निम्म्यावर..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grapes

सातारा : द्राक्ष उत्पादन यंदा निम्म्यावर..!

कलेढोण : जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षांना यंदा एप्रिल महिन्यात परेसा सूर्यप्रकाश मिळाला. त्याचा परिणाम झाडांवर होऊन द्राक्षकाडीवर फलधारणा निम्म्यावर झाली. एकरी १८ टन उत्पादन देणाऱ्या बागेतून यावर्षी सुमारे सहा ते आठ टनच उत्पादन मिळणार आहे. कोरोनानंतर द्राक्षबागायतदारांवर लहरी हवामानाचे संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यात कलेढोण हे द्राक्ष उत्पादनाचे आगर आहे. दरवर्षी सुमारे ५०० ते ६५० एकरांवर कलेढोण व भागातील शेतकरी द्राक्ष उत्पादन घेतात. येथून काही द्राक्षे युरोपला तर काही लोकल मार्केटला जातात. मागील वर्षी युरोपच्या मालास सुमारे ६५ ते ८५ रुपये प्रति किलो दर मिळाला होता. तर लोकल मार्केटला सुमारे २३ ते ३४ रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. द्राक्षपिकाची चांगली जपणूक केली असता शेतकऱ्याच्या हाती चार पैसे राहतात.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

मात्र, लहरी हवामान व कोरोनामुळे गत दोन वर्षांत शेतकरी संकटात सापडला आहे. मागील वर्षीच्या जास्तीच्या पावसाचा परिणाम यावर्षीच्या द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. ऑक्टोबर छाटणीपूर्वी द्राक्षाला चांगल्या सूर्यप्रकाशाची गरज भासते. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता कमी पडल्याने द्राक्षवेलीवर फलधारणा चांगली होऊ शकली नाही. ती एका झाडावर सुमारे ३० ते ३५ द्राक्षघडांतून उत्पादन घेतले जाते. सरासरी एक झाड सुमारे ३५० ते ४०० ग्रॅम उत्पादन देते. तर साधारणपणे एका झाडावर सरासरी ३० ते ३५ द्राक्षघड ठेऊन एकरी १५०० झाडांपासून १८ टन असे उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करतात.

मात्र, यावर्षी कमी उन्हाच्या तीव्रतेमुळे झाडांवर पुरेशी फलधारणा न झाल्याने सरासरी आठ ते दहा द्राक्षघडच दिसून येत आहेत. त्यामुळे एकरी उत्पादन हे सहा टन म्हणजेच निम्म्याहून कमी होणार असल्याचे शेतकरी सुनील देशमुख यांनी सांगितले. कलेढोण व भागातील विखळे, मुळीकवाडी, पाचवड, गारळेवाडी, गारुडी आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या बागेतही यंदा द्राक्षकाडीवर फलधारणा कमी झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. ही घट अर्ध्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या हातात मुद्दल तरी येणार का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

मागील वर्षी पावसामुळे व यंदा एप्रिलमधील कमी सूर्यप्रकाशामुळे द्राक्षघडांवर फलधारणा कमी झाल्याने उत्पादन घटणार आहे.

-दीपक यलमर, कान्हरवाडी

दरवर्षी एका झाडावर ३० ते ३५ घड असायचे. यावर्षी ते आठ ते दहा दिसत आहेत. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

-सुनील देशमुख, वडाचामळा-विखळे

loading image
go to top