CoronaUpdate : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कृष्णा रुग्णालयात दाखल

सचिन शिंदे | Saturday, 15 August 2020

पालकमंत्री पाटील रुग्णालयात दाखल झाल्याने आज (शनिवार) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाला.   

कऱ्हाड : राज्याचे सहकार मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली. शुक्रवारी (ता.14) रात्री त्यांची तपासणी करण्यात आली हाेती. तसेच स्वॅबही घेण्यात आला. दोन्ही टेस्ट पाॅझिटिव्ह आल्या आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कुटूंबियांकडून दुजोरा  देण्यात आला आहे.

पालकमंत्री पाटील यांना कृष्णा रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे. गुरुवारपासून (ता.13) मंत्री पाटील यांना त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांनी तपासणी केली हाेती. या तपासणीत त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. आता त्यांची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरु आहेत. कार्यकर्त्यांनी काळजी करु नये असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं?  सातारच्या छत्रपतींचा हा सेनापती डायरेक्‍ट लंडनला!

दरम्यान पालकमंत्री पाटील रुग्णालयात दाखल झाल्याने आज (शनिवार) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाला. 

Edited By : Siddharth Latkar