सातारा हिल हाफ मॅरेथॉन यावर्षी १८ सप्टेंबरला

जिल्ह्यातील धावपटूंसाठी उद्यापासून नावनोंदणी
Satara hill Half Marathon
Satara hill Half MarathonSakal

सातारा - गेल्या दहा वर्षांपासून साताऱ्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशातील धावपटू आतुरतेने वाट पाहत असलेली ''सातारा हिल हाफ मॅरेथॉन'' स्पर्धा यंदा ''फिटनेस जिंदाबाद'' हे घोषवाक्य घेऊन आयोजित केली आहे. १८ सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील विविध गटांतील हौशी स्पर्धकांना सहभाग मिळावा, यासाठी संयोजकांनी सर्वांत अगोदर नावनोंदणीची संधी दिली आहे. १८ ते २१ मे पर्यंत सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत सातारकरांना नावनोंदणी करता येईल. त्यात खास सवलतही दिली जाणार आहे.

कोरोना संसर्गामुळे स्पर्धेत खंड पडला होता. मात्र, यंदा नव्या जोमाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून प्रचंड मागणी असल्याने केवळ काही तासांतच सर्व नोंदणी पूर्ण होते. त्यामुळे बाहेरील स्पर्धकांना प्रवेश देण्यापूर्वी सातारकरांसाठी बुधवारपासून (ता.१८) चार दिवस नावनोंदणीसाठी खुले ठेवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील हौशी धावपटूंसाठी सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे.

गेल्या दोन वर्षांत यवतेश्वर घाटातील रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरणामुळे मॅरेथॉनच्या मार्गावरील रस्ते प्रशस्त झाले आहेत. सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न व सुंदर घाटरस्त्यांवर धावपटूंचा कस पाहणाऱ्या या एकवीस किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील हौशी धावपटूंनी तातडीने नावनोंदणी करावी. उरलेल्या सर्व जागा जिल्ह्याबाहेरील धावपटूंसाठी खुल्या केल्या जातील, असे संयोजकांनी कळविले आहे.

सवलतीच्या दरातील नावनोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक असून त्यावर सातारा जिल्ह्यातीलच पत्ता आवश्यक आहे. मूळ साताऱ्याचे परंतु कायमस्वरूपी साताऱ्याबाहेर स्थायिक झालेल्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. नावनोंदणी व अधिक माहितीकरिता www.runsatara.com या संकेतस्थळ, फेसबुक व इंस्टाग्रामवर सातारा हिल हाफ मॅरेथॉन पेजला भेट द्यावी, असे आवाहन सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, अध्यक्षा डॉ. सुचित्रा काटे व रेस डायरेक्टर डॉ. पल्लवी पिसाळ यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com