एकी हेच बळ : कर्‍हाडात अवघ्या दाेन तासांत शंभर युवक जमले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकी हेच बळ : कर्‍हाडात अवघ्या दाेन तासांत शंभर युवक जमले

आरोग्य विभागास रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत गजानन मंडळाने येथील गणपती मंदिरात रक्तदान शिबीर झाले.

एकी हेच बळ : कर्‍हाडात अवघ्या दाेन तासांत शंभर युवक जमले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्‍हाड : कोरोनाच्या काळात रक्ताचा पुरवटा कमी पडू नये, यासाठी येथील गजानन नाट्य मंडळाने रक्तदान शिबीर घेणार अशल्याचे जाहीर केले. त्या त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत अवघ्या दोन तास शहर व परसरातील तब्बल शभर युवकांना त्यांचे रक्तदान केले.

त्यांच्या त्या कार्याचे शहरात कोतुक होत आहे. गणेश मंडळांनी मनात आणले तर ते फार चांगल्या सव्रूपाचे समाज कार्यही उभे करू शकतात, असाच संदेश गजानन नाट्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान सिबीर घेवून दिला आहे. येथील महालक्ष्मी ब्लड बँकच्या सहकाऱ्यांने रक्तदान शिबिर झाले. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या हस्ते उदघाटन झाले. आरोग्य विभागास रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत गजानन मंडळाने येथील गणपती मंदिरात रक्तदान शिबीर झाले. त्यात शहर व परिसरातील शंभर युवकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना ब्लड बँकेतर्पे प्रशस्तीपञक देण्यात आले.

लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक सुहास पवार, जयंत बेडेकर, प्रमोद पाटील, सागर बर्गे आदींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गजानन नाट्य मंडळातर्फे अर्सोनिक अल्बम ३० रोगप्रतिकार शक्ती होमिओपॅथी गोळीचे वाटप केले. त्याची पोस्टरही वाटण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष विशाल बेडके, उपाध्यक्ष सौरभ शाह, संदिप मुंढेकर, राहूल पुरोहित, गणेश बेडके, शंभूराज नलवडे, अक्षय राऊत, सोमनाथ राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

वाधवानांनंतर आता या धनिकाला कोणाचा वरदहस्त

कोरोनाच्या आणि अन्य बातम्या येथे वाचा

चला तंबाखू करु या कायमची लॉकडाऊन

रिप्‍लायच्‍या भानगडी...
 

loading image
go to top