सातारा : गमेवाडी पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीचे आदेश

विरोधी सदस्यांनी मारली सभेला दांडी
water
watersakal

सातारा (पाटण) ः गमेवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजना व इतर विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली असून, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्या रूपाली पवार यांनी केली. त्यावर चौकशी करून अहवाल द्यावा, अशा सूचना सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिल्या. मात्र, या सभेला विरोधी सदस्यांनी दांडी मारली होती. १२ डिसेंबर रोजी पंचायत समितीत खासदार शरद पवार यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सभापतींनी सभागृहात सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पंचायत समितीची मासिक सभा सभापती राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, उपसभापती प्रतापराव देसाई, सहायक गटविकास अधिकारी विजय विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती. मनरेगामधून १०० शाळांचे शाळा परिसर सुशोभीकरणाचे प्रस्ताव आले असल्याचे व ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमात सर्व सदस्यांनी सहभाग घेण्याबाबतची माहिती गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी दिली.

water
बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

येरफळे अंगणवाडीत मुलांना बसण्यास गैरसोय असून, फरशीतून पाणी पाझरत असल्याबाबत उज्ज्वला लोहार यांनी लक्ष वेधले. सभापतींनी काही अंगणवाडी सेविका अंगणवाड्यांत येत नसल्याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याचे प्रकल्प अधिकारी राजश्री बने यांना सांगितले. श्री. बने यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कोयनानगर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी मुक्कामी नसतात याचा वाईट अनुभव स्वतःलाच आल्याचे सभापती शेलार यांनी तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत खराडे यांना सांगितले.

सौर शेतीपंप योजनेचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन वीज वितरणच्या उपअभियंता अमित आदमाने यांनी केले. गमेवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे काम चुकीचे असल्याचा आरोप रूपाली कदम यांनी केला. तेथील ग्रामसेवकाच्या चौकशीचे काय झाले? असे सभापतींनी विस्तार अधिकाऱ्यांना विचारले. पुन्हा रूपाली पवार आक्रमक झाल्या व सर्व कामे निकृष्ट व कागदपत्रे उपलब्ध नाहीत असा गंभीर आरोप केला. सभापतींनी चौकशी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या.

पराभव जिव्हारी लागल्याने विरोधी सदस्य गैरहजर!

महाआघाडीचा प्रोटोकॉल सांभाळून घरकुल योजनेचे पुरस्कार वितरण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आम्ही घेतले. मात्र, जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी लागल्यामुळेच विरोधी सदस्य गैरहजर राहिले, अशी टिप्पणी उपसभापती प्रतापराव देसाई यांनी केली. सभागृहात सत्यजितसिंह पाटणकरांच्या अभिनंदनाचा ठराव बबनराव कांबळे यांनी मांडला, तो सर्वानुमते संमत करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com