कोरोनाला रोखण्यासाठी जावळीकरांची वज्रमूठ

jawali
jawali

कुडाळ (जि. सातारा) ः कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जावळीकरांची वज्रमूठ बांधली असून, जनजागृतीसाठी "मी एक जबाबदार जावळीकर' अभियान राबवण्यात येत आहे. त्याला जावळीकरांतून चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. 

गेल्या दोन महिन्यांत जावळी तालुक्‍यातील कोरोनाच्या चढत्या आलेखावर उपाययोजना करण्याबाबत तालुक्‍यातील एका व्हॉट्‌सऍप ग्रुपवर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली होती. प्रशासनाच्या प्रयत्नांना सामाजिक स्तरातून सहकार्य होणे अपेक्षित असल्याचे मत त्यामध्ये अनेकांनी व्यक्त केले. त्याला अनुसरून तालुक्‍यात कोरोना जनजागृतीसंदर्भात सामाजिक कार्य करण्याचे ठरले. त्यानुसार या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करण्यात आला. 

पहिल्या माहिती पत्रकाचे प्रकाशन तहसीलदार शरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तालुक्‍यातील विविध क्षेत्रांत काम करणारे मान्यवर उपस्थित होते. या वेळी तालुक्‍यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याना बोलवून माहिती पत्रके त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत असून, आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या अभियानाची माहिती पत्रके लोकांपर्यंत पोचवण्यात येतील, असे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सांगितले. 

जावळी तालुक्‍यात सुरू करण्यात आलेल्या "मी एक जबाबदार जावळीकर' या अभियानाला सातारा येथील "सवयभान'चे सदस्य राजेंद्र चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले असून, मेढ्यातील सोमनाथ काशीलकर यांच्या जीवनमित्र फाउंडेशनच्या वतीने दहा हजार पत्रके छापून देण्यात आली आहेत. दरम्यान, या अभियानाला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सयाजीराव शिंदे यांनी प्रशासनाचे आभार मानले. 


जावळी तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी तालुक्‍यातील एका व्हॉट्‌सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असलेले सामूहिक प्रयत्न उपयोगी पडतील. "मी एक जबाबदार जावळीकर' ही संकल्पना उपयुक्त आहे. 

- शरद पाटील, तहसीलदार, जावळी 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com