
सातारा : कऱ्हाडला ५५० गाळ्यांचे फेरलिलाव
कऱ्हाड: पालिकेच्या गाळ्यांपैकी मुदत संपलेल्या ५५० हून अधिक जुन्या गाळ्यांच्या फेरलिलावाची पालिकेने तयारी केली आहे. तब्बल १५ ते ३० वर्षांपासून त्या गाळ्यांचे ठरलेल्या मुदतीप्रमाणे लिलाव न झाल्याने त्यांची मुदत संपल्याने ते गाळे फेरलिलावात सामील करण्यात आलेले आहेत. त्याबरोबर मागील सहा महिन्यांपूर्वी पालिकेने व्यापाऱ्यांना गाळ्यांच्या दुप्पट भाडे आकारणी केली होती. वाढीव भाडे व्यापाऱ्यांनी भरल्याने पालिकेच्या उत्पन्नात तब्बल दोन कोटींनी वाढ झाली आहे. फेरलिलावातून पालिकेला नव्याने उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे.
हेही वाचा: Satara : राष्ट्रवादीला धक्का; सेनेच्या महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंना रोखलं
पालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांचे वर्षानुवर्षे भाडे एकसारखेच आहे. पालिकेने मध्यंतरी त्याचा सर्वे केला. त्यानुसार त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेऊन भाड्याची आकारणी केली. नोटिसीनुसार व्यापाऱ्यांनी दुप्पट भाडे भरले आहे. त्यात पालिकचे उत्पन्नही दुप्पट झाले. तब्बल दोन कोटींने उत्पनात वाढ झाली. मार्च २०२१ पर्यंत पालिकेला गाळ्यांच्या भाड्यातून अडीच कोटींचा महसूल अपेक्षित होता. मागील वेळी सव्वा कोटीची वसुली झाली. त्यात पालिकेने जनरल गाळ्यातून ५१ लाख ७६ हजार, आयुडीपीतील गाळ्यांतून ३२ लाख ८० हजार, आयुडीपी योजनेतील गाळ्यांतून २८ लाख ५८ हजार तर युडी सहा योजनेतील गाळ्यांतून १३ लाख ७९ हजारांचा महसूल मिळाला. अडीच कोटीपैकी सव्वा कोटी थकीत होते. त्याचवेळी दुप्पट भाडे वाढीच्या नोटिसा आकारल्या गेल्या. त्याला सुरवातीला विरोध झाला. मात्र, पुन्हा भाडे भरले गेल्याने पालिकेच्या उत्पन्नात दोन कोटींने वाढ झाली.
हेही वाचा: Satara : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचं कऱ्हाडात निधन
शहरात तब्बल ७०४ पैकी जनरल योजनेतून २०८, आययुडीपीनेतून २३० तर युडी सहा योजनेतून २६८ गाळे बांधले आहेत. पालिकेचे ६९८ गाळे आहेत. चार हॉल तर दोन इमारती अशी स्थावर मालमत्ता आहे. दुप्पट भाडे आकारणीनंतर पालिकेने मुदत संपलेल्या गाळ्यांच्या फेरलिलावाचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यानुसार शहरातील ५५० मुदत संपलेल्या गाळ्यांचा सर्वे पालिकेने केला आहे. त्यामुळे त्या गाळ्यांवर फेरलिलावाची कुऱ्हाड कोसळणार आहे. १५ ते ३० वर्षांत एकदाच नाममात्र त्या त्या गाळ्यांचे करार झाले आहेत. तीन दशकांत एकदाही लिलाव न झाल्याने त्याची मुदत संपली आहे. त्या गाळ्यांची माहिती घेऊन त्यांची मुदत संपल्याने गाळ्यांचे पालिका फेरलिलाव करणार आहे. त्यातून नव्याने पालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहेत.
हेही वाचा: Satara : सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचं जबरदस्त वर्चस्व
पालिकेचे पेठनिहाय गाळे
शनिवार पेठ - ३६३ गाळे व चार हॉल
गुरुवार पेठ - २९६ गाळे
बुधवार पेठ - २० गाळे
सोमवार पेठ - १६ गाळे व एक इमारत
मंगळवार पेठ - तीन गाळे
रविवार पेठ - एक इमारत
Web Title: Satara Karhad Auctioned 550 Blocks
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..