Sun, June 4, 2023

Satara : कोयना धरणातून सिंचन,पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग
Published on : 8 March 2023, 7:12 am
पाटण : कोयना धरणातून पुर्वेकडे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या पायथा वीज गृहातील दोन्ही युनिट मधून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र कृष्णा व कोयना नदीकाठावरील परिसरातून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.
त्यामुळे अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी नदी विमोचकामधून एक हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग आज दुपारी एक वाजता करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. पायथा वीज गृह आणि नदी विमोचकामधून एकूण तीन हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे.
कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू असून नदीपात्रामध्ये २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना जलाशयाची पाणी पातळी: २१२६. ०७ फुट असुन शिल्लक पाणीसाठा ६७.०५ टीएमसी आहे.