esakal | बॉम्बेचे मुंबई झाले ना! औरंगाबादच्या नामांतरावर उदयनराजेंची स्पष्ट भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद टोकाला गेला असतानाच, आता खासदार उदयनराजे भोसले यांनी नामांतर वादात उडी घेतली आहे.

बॉम्बेचे मुंबई झाले ना! औरंगाबादच्या नामांतरावर उदयनराजेंची स्पष्ट भूमिका

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद टोकाला गेला असतानाच, आता खासदार उदयनराजे भोसले यांनी नामांतर वादात उडी घेतली आहे. आज साताऱ्यात (शुक्रवार) माध्यमांनी उदयनराजेंना नामांतराबाबत छेडले असता, आपली रोखठोक भूमिका मांडत अप्रत्यक्षपणे औरंगाबादच्या नामांतराला पाठिंबा दर्शविला आहे. 

मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून गुरुवारी जारी करण्यात आली. यामध्ये औरंगाबादचा उल्लेख 'संभाजी नगर' करण्यात आला होता. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीकाही केली होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे थोरात यांनी ठणकावून सांगितलं होतं. परंतु, आता खासदार उदयनराजेंनीही आपली भूमिका स्पष्ट करत औरंगाबादच्या नामांतराला अप्रत्य पाठिंबा दर्शविल्याने सरकार समोर पेच निर्माण झाला आहे.

उदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; अभी के अभी म्हणत उडवली पुन्हा काॅलर

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून माध्यमांनी उदयनराजेंना छेडले असता, ते म्हणाले, नामांतर करताना कोणाचीही मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराज किंवा छ. संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून ते ओळखले जात नव्हते. त्यांची कर्तबगारी आणि लोक हिताच्या निर्णयामुळे ते ओळखत होते. ज्याप्रमाणे बॉम्बेचे मुंबई झाले, त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेल्या औरंगाबादच्या बाबतीत नाव बदलायचे की नाही याचा लोकशाहीनुसार लोक निर्णय घेतील, अशी ठोस भूमिका उदयनराजेंनी मांडली आहे. या नामांतर वादावर सरकार कोणता तोडगा काढणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सातारकरांच्या जयघाेषात उदयनराजेंनी केले महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन 

loading image
go to top