बिबट्याच्या वावरामुळे भरतगाववाडीत चिंता

बिबट्याच्या वावरामुळे भरतगाववाडीत चिंता

नागठाणे (जि.सातारा) : परिसरातील भरतगाववाडी (ता. सातारा) येथील गावालगतच्या शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्यामुळे ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावालगत असलेल्या प्रवीण घाडगे यांच्या नंबर नावाच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. 

चार दिवसांपूर्वी घाडगे यांच्या शिवारातील शेडवर असलेल्या दोन पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या दिवसापासून दोन्ही कुत्री गायब असल्याचे दिसून आले आहे. या घटनेनंतर विभागातील वनरक्षक संजय धोंडवड यांना याविषयी माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सध्या शिवारातून पेरणीची लगबग सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
या पार्श्वभूमीवर वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या वेळी प्रवीण घाडगे, सुभेदार विलासराव घाडगे, जनार्दन घाडगे, आकाश घाडगे, प्रकाश पवार, समीर पडवळ, महेश पडवळ, कृष्णत घाडगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

‘दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे – प्रा. डॉ. नितीन कदम यांनी केले वेबिनारद्वारे मार्गदर्शन

जो कष्ट घेतो, तोच बाजी मारतो..!  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com