esakal | महाबळेश्‍वर : शेतकरी, व्यापारी, लघू व मोठ्या कारखानदारांसाठी महत्वाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

महाबळेश्‍वर : शेतकरी, व्यापारी, लघू व मोठ्या कारखानदारांसाठी महत्वाची बातमी

महाबळेश्वर आगारात मालवाहतुकीसाठी आगाऊ आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.  

महाबळेश्‍वर : शेतकरी, व्यापारी, लघू व मोठ्या कारखानदारांसाठी महत्वाची बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केळघर (जि.सातारा) :  महाबळेश्वर आगाराच्या वतीने शेतकरी, व्यापारी, लघु व मोठे कारखानदार यांना मालवाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने ट्रक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. व्यापाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांनी केले.
 
श्री. पतंगे म्हणाले, शेतकरी, व्यापारी, छोटे तसेच लघु व मोठे कारखानदार असलेल्यांसाठी माफक दरात एसटीतर्फे मालवाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध करून दिले जात आहेत. त्याद्वारे राज्यात कुठेही मालवाहतूक करण्यास मंजुरी आहे. मालवाहतुकीसाठी बंद व खुले टफ असणारे ट्रक उपलब्ध असतील. एसटीच्या ट्रकमधून एकाच वेळी नऊ टन मालाची वाहतूक करता येणार आहे.

महाबळेश्वर आगारात मालवाहतुकीसाठी आगाऊ आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली असून व्यापारी, शेतकऱ्यांनी श्री. पतंगे (9766241778), वरिष्ठ लिपिक महेश शिंदे (9975633802, 8788340296), सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ (9923673553, 7666723758), लेखनिक अजित जमदाडे (8888410841) यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पतंगे यांनी केले आहे.

या प्रश्नावर अजित पवार म्‍हणाले, सातारकरांबद्दल आम्‍हाला अभिमानच... 

loading image