स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 : मलकापुरातील भिंती ठरताहेत आकर्षणाचा केंद्रबिंदू; शहरात स्वच्छतेचा जागर

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

मलकापूर (जि. सातारा) : स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठी येथील पालिकेने विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडूनच स्वच्छतेचे काम सुरू आहे. बोलक्‍या भिंतींच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर तळागाळात पोचवून मलकापूरला देशात पहिल्या पाच शहरांत आणण्यासाठी शहरात सारिपाट वाचला जात आहे. केंद्रीय पथकास सामोरे जाण्यासाठी शहराने आत्तापासूनच स्वच्छ सर्वेक्षण 2021 ची जोमात तयारी सुरू केली आहे. 

मलकापूरने स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये देशात 141, 2019 मध्ये 51 व 2020 मध्ये 25 वा, पश्‍चिम भारतात 11 वा तर राज्यात दहावा क्रमांक पटकावला आहे. तर स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी कंबर कसली आहे. या स्पर्धेचे तीन टप्प्यात शहराचे परीक्षण करून 4 हजार गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. मलकापूर शहराने स्वच्छतेबाबत सातत्याने विविध पर्याय करत सध्या देशातील मोजक्‍याच शहरात आपले स्थान प्राप्त केले आहे. ठिकठिकाणी शहरातील बोलक्‍या भिंतींद्वारे स्वच्छतेबाबत सातत्याने प्रबोधन व सेवा देत घराघरांत केवळ स्वच्छतेचा नारा पोचवला आहे. पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 च्या अनुषंगाने विशेष नियोजन केले असून, शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी नऊ घटागाड्यांसह दोन ट्रॅक्‍टर सुरू ठेवले आहेत.

घराघरातील महिलाही ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घंटगाडीतच देत आहेत. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प आठ जुलै 2017 पासून कार्यान्वित केला आहे. ओल्या कचऱ्यापासून रोटरी ड्रम बेस कंपोस्ट खतनिर्मिती केली जात आहे. या स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी शहरातील दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 14 खासगी विद्यालये, महाविद्यालये, 22 अंगणवाड्यांचा समावेश आहे. शहरातील सर्व नागरिकांनी स्वतःसाठीच स्वच्छता करायची, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातून जाणारे उपमार्ग, राज्यमार्ग व कऱ्हाड-ढेबेवाडी रस्ता हे स्वच्छ ठेवणे खऱ्या अर्थाने स्थानिक प्रशासनापुढे आव्हान होते. ते आव्हान स्थानिक प्रशासनाने स्वीकारून दिवसातून दोन वेळा झाडून रस्ते चकाचक ठेवले आहेत. बोलक्‍या भिंती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भिंतींवरील दिलेल्या संदेशातून स्वच्छतेचे प्रबोधन केले जात आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com