esakal | डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण देशात सन्मानाने राहू शकताे
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Babasaheb Ambedkar

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण देशात सन्मानाने राहू शकतो'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : "इंडिया इज भारत' ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली देणगी असून, त्यामुळे आज आपण देशात सन्मानाने राहू शकतो आहे, असे प्रतिपादन येथील 15 ऑगस्ट राष्ट्रीय उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रा. विक्रम पवार यांनी केले.

येथील 15 ऑगस्ट राष्ट्रीय उत्सव मंडळ, गुरुवार परज आणि भारतरत्न मौलाना अब्दुल कलम आझाद मैदान समिती व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्या वेळी श्री. पवार बोलत होते.

शहर सुधार समितीचे अध्यक्ष अस्लम तडसरकर यांनी डॉ. आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल व शेती शाळेमध्ये झाले असून, तो साताऱ्यासाठी एतिहासिक संदर्भ असल्याचे नमूद करून श्री. तडसरकर यांनी मंडळाच्या वतीने सुरू केलेल्या प्रबोधन वाचनालयास डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेले अनहिलेशन ऑफ कास्टस (जाती निर्मूलन व्यवस्था) हे पुस्तक भेट दिले. मंडळाचे सचिव प्रकाश खटावकर यांनी मंडळाची स्थापना आणि त्यामागच्या उद्देशाची माहिती प्रास्ताविकात दिली.

या मंडळाचे अध्यक्ष मुनव्वर कलाल यांनी सूत्रसंचालन, स्वागत करून सर्वांनी मंडळाच्या अशा उपक्रमांत असाच सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. मंडळाचे उपाध्यक्ष मुखतार पालकर यांनी आभार मानले. या वेळी दीपक घडचिरे, बबनराव कांबळे, खलील महंमद खान, सलमान चौधरी, शौकत बागवान, भारत गडकरी आदी उपस्थित हाेते.

नाईकबाच्या डोंगराला पोलिसांचा वेढा; ढेबेवाडीत आठ ठिकाणी नाकाबंदी