esakal | सातारकरांनाे! कोविड 19 माेफत लसीकरणासाठी पालिकेची दोन केंद्रे

बोलून बातमी शोधा

सातारकरांनाे! कोविड 19 माेफत लसीकरणासाठी पालिकेची दोन केंद्रे

पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या केंद्रात जाऊन नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही पालिकेतर्फे नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी अभिजित बापट, उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे.

सातारकरांनाे! कोविड 19 माेफत लसीकरणासाठी पालिकेची दोन केंद्रे
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा पालिकेने राजवाडा येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात, तसेच गोडोली येथील (कै.) दादामहाराज आरोग्य केंद्रात शासनाच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना कोविड 19 (Covid 19 Vaccine) वरील मोफत लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणाचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
 
कोविड 19 वरील लसीकरणाचे वेळापत्रक केंद्र व राज्य शासनाने जाहीर केले होते. यानुसार यापुढील काळात विविध आजार असलेल्या, नसलेल्या 45 ते 60 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यानुसार पालिकेने दोन लसीकरण केंद्रे उभारली असून, त्याठिकाणी नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आधार कार्डाचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

भारतीय बनावटीची लस सुरक्षित असून, आगामी काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठीची खबरदारी नागरिकांनी घेण्याचे आवाहनही खासदार उदयनराजे यांनी केले आहे. पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या केंद्रात जाऊन नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही पालिकेतर्फे नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी अभिजित बापट, उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे.

शुभमंगल सावधानसाठी आता फक्त 50 जणांचीच उपस्थिती; जिल्ह्यात नवी नियमावली जाहीर

राज्यात कोरोनाचा कहर! जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत नववीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद

जेव्हा तुमचे मूल आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगताेय; जाणून घ्या काय करावे

ग्रामविकासकडून मुदतवाढ मिळूनही वसुली; झेडपीच्या निर्णयाने शिक्षकांच्या लढ्याला मोठं यश

माण तालुक्‍यात हातमोज्याने केली ज्वारीची काढणी; शेतकरी वर्ग सुगीत मग्न

Edited By : Siddharth Latkar