साता-यात पावसास प्रारंभ; काेल्हापूरसह काेकणात आजही बरसणार

काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
rain
rainsystem

सातारा : ताैक्ते वादळामुळे गेल्या दाेन दिवसांत साता-यासह काेकणपट्यात पावसाची संततधार सुरु हाेती. हवामान खात्याने आज (मंगळवार) दुपारी दाेन वाजता पुढील तीन तासांत काेल्हापूर, सिंधूदूर्गससह पालघर जिल्ह्यातील काही भागात वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सातारा शहरात आज (मंगळवार) सकाळपासून ढगाळ वातावरण हाेते. परंतु अकरा नंतर सातारा शहरात कडकडीत ऊन पडले हाेते. दुपारी अडीचच्या सुमारास रिमझिम पावसास प्रारंभ झाला. यामुळे जिल्हा रुग्णालय तसेच विविध रुग्णालयांत वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जात असलेल्या रुग्णांना पावसात भिजत जावे लागले.

rain
जीव गेल्यास गप्प बसणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा

हवामान खात्याने आज मंगळवार (ता.१८) पश्चिम महाराष्ट्रातील काेल्हापूर, काेकणातील सिंधूदूर्गसह पालघर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काेल्हापूर आणि सिंधूदूर्गला वाऱ्याचा वेगही ताशी 30-40 किलोमीटरपर्यंत तसेच पालघरला 40-50 किलाेमीटरपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com