esakal | प्राचार्यांनी बनवले विद्यार्थ्यांसाठी मास्क
sakal

बोलून बातमी शोधा

karad

कोरोना संसर्ग कमी होत नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षातील कामकाज लांबण्याची शक्‍यता आहे. शाळा, महाविद्यालयेही उशीरा सुरू होण्याची शक्‍यता आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचा विचार करुन उंडाळ्यातील प्राचार्य बी. पी. मिरजकर यांनी लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी स्वतः एक हजार कापडी मास्क तयार केले आहेत. 

प्राचार्यांनी बनवले विद्यार्थ्यांसाठी मास्क

sakal_logo
By
जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) ः कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी. पी. मिरजकर यांनी स्वखर्चातून कापडी एक हजार मास्क शिवून तयार केले आहेत. 

सध्या संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. त्याची सर्वच क्षेत्राला झळ पोचली आहे. शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. येत्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाबाबत शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील, याची निश्‍चिती नाही. मात्र, विद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यालयांत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बहुतांश शाळांनी वर्ग खोल्या, बेंच, स्वच्छतागृह, व्हरांड्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. विद्यार्थी विद्यालयात आल्यानंतर त्याला मास्कसह येता यावे, यासाठी प्राचार्य मिरजकर यांनी एप्रिल महिन्यात कापड व आवश्‍यक मटेरियल स्वतः खरेदी केले व घरी शिलाई मशिनवर स्वतः सुमारे एक हजारांपेक्षा जास्त मास्क शिवून तयार केले. 

याबाबत श्री. मिरजकर म्हणाले, ""मार्च महिन्यात लॉकडाउन सुरू झाले. नागरिक अनेक कारणांमुळे घराबाहेर पडत होते. परंतु, मास्क उपलब्ध नसल्याने तसेच मास्कबद्दल जागरुकता नसल्याने वापर होत नव्हता. त्यातूनच शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी डोळ्यासमोर आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क द्यायची कल्पना सुचली. पावसाळ्यात मास्क भिजण्याची शक्‍यता आहे. अशावेळी शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आपल्याकडचे मास्क देता येतील, या भावनेने लॉकडाउनमधील वेळेचा सदुपयोग करत स्वतः मास्क शिवण्याचे काम सुरू केले.'' 

याकामी त्यांना त्यांची शिक्षक पत्नी संगीता, त्यांची मुले डॉ. सौरभ आणि डॉ. प्रज्ञा व राधाकृष्ण वस्त्र भांडारचे सहकार्य लाभले. 

शिक्षकांना 12 नको, आठ तास हवी ड्युटी, चेकपोस्टवर बिघडते आरोग्य