पार्लेतील कोविड सेंटरमध्ये आता औषधोपचारही!
दैनिक "सकाळ'ने आवाज उठवला होता. त्याची दखल प्रशानसाने घेतली आहे. त्यानुसार आता तेथील कोविड सेंटरमध्ये औषधोपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय होणार आहे.
कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाबाधित रुग्णांच्या आयसोलेशनसाठी पार्ले येथे कोविड सेंटर कार्यरत आहे. तेथे पॉझिटिव्ह मात्र कोणताही त्रास नसणाऱ्या रुग्णांना ठेवण्यात येते. परंतु, अनेकदा अचानक रुग्णांना काही ना काही त्रास सुरू होतो. त्यावेळी तेथे औषधे उपलब्ध नसतात. त्यासंदर्भात दैनिक "सकाळ'ने आवाज उठवला होता. त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार तेथे औषधोपचारांची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तेथे व्हिजिटिंग फिजिशिएशनचीही सोय करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिले आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय होणार आहे.
कोरोनाबाधितांच्या सोयीसाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन पार्लेतील वसतिगृहात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे कोरोना पॉझिटिव्ह मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवले जाते. ज्यावेळी रुग्ण तेथे जातो, त्यावेळी त्याची तब्येत चांगली असते. मात्र, काही दिवसांनी तब्येत बिघडत चालल्याचीही उदाहरणे घडली आहेत. तब्येत बिघडल्यावर त्यांना कोविड सेंटरमध्ये औषधोपचार केला जात नाही. त्याचबरोबर तेथे पूर्वी ऑक्सिजनचीही सोय नव्हती.
मात्र, रुग्णांची प्रकृती बिघडल्यावर त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी आल्यावर त्यांना तातडीने अन्य रुग्णालयात हलवावे लागत होते. त्याचा विचार करून मध्यंतरी तेथे ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. मात्र, तेथे औषधोपचासाठीही यंत्रणा कार्यान्वित नाही. बाधित रुग्णांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पार्ले सेंटरमधून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येते. तेथे तातडीने बेड उपलब्ध होतो असे नाही. तेथेही बेडसाठी मोठी वेटिंग लिस्ट असते. त्यामुळे संबंधित रुग्णाला विनाऔषधाचे तसेच काही दिवस काढावे लागतात.
त्यासंदर्भात दैनिक "सकाळ'ने आवाज उठवला होता. त्याची दखल प्रशानसाने घेतली आहे. त्यानुसार आता तेथील कोविड सेंटरमध्ये औषधोपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय होणार आहे. त्याचबरोबर तेथे व्हिजिटिंग फिजिशिएशनचीही सोय करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी दिघे यांनी दिले आहे. त्यामुळे रुग्णांना तेथे उपचाराची उपलब्धता होणार आहे.
संपादन : पांडुरंग बर्गे