सातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी

आजी-माजी सैनिकांनी स्वस्त दरामध्ये संसार उपयोगी साहित्य व मद्य मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मिलिटरी कॅन्टीनची सुविधा करण्यात आली आहे. यापूर्वी कोणत्याही तालुक्यातील नागरिक कधीही कॅन्टीनला येवू शकत होता. परंतु, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी कमी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वेळापत्रक बनविले जात आहे.

सातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना संसर्ग टाळण्यासाठीची उपाय योजना म्हणून मिलीटरी कॅन्टीनच्या व्यवस्थापकांनी प्रत्येक तालुका निहाय दिवस ठरवून दिले आहेत. त्याच दिवशी संबंधीत तालुक्‍यातील आजी-माजी सैनिकांनी साहित्य घेण्यासाठी यावे असे आवाहन व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी केले आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्याच पद्धतीने मिलीटरी कॅन्टीनमध्येही उपाय योजना केल्या जात आहेत. सातारा मिलीटरी कॅन्टीनमध्ये जिल्ह्यातील तसेच महाड येथूनही आजी-माजी सैनिक साहित्याच्या खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात गर्दी होत असते. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांमध्ये शारिरीक अंतर पाळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे येणाऱ्या व्यक्तींची गर्दी नियंत्रणात ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शिंदे यांनी तालुका निहाय दिवस ठरवून दिले आहेत. 

तारीख व तालुके पुढील प्रमाणे : तीन ते सहा जून : सातारा, वाई, कोरेगाव, पाटण. सात ते 12 जून : महाबळेश्‍वर, खंडाळा, जावळी. 13 ते 18 जून महाड, खटाव, माण, वेळापूर, फलटण. 19 ते 24 जून वाई, कोरेगाव, सातारा, पाटण, फलटण. 25 ते 29 जून वरील तारखेस येवून न शकलेल्या कार्ड धारकांनी या दिवशी साहित्य खरेदी करायला यायचे आहे. 

दिवस ठरवून देण्याबरोबरच येणाऱ्या आजी-माजी सैनिकांसाठी काही नियमावलीही करण्यात आली आहे. कॅन्टीन सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचार या कालावधीत सुरू राहणार आहे. परंतु, कोणीही साडेसातपूर्वी कॅन्टीनला यायचे नाही.

त्याचबरोबर एका कार्डवर एकाच व्यक्तीने यायचे आहे. 65 वर्षावरील कार्डधारकांनी आला प्रतिनधी ओळखपत्र व मद्य परवान्यासह पाठवायचा आहे. प्रतिबंधीत गावातील लोकांना मात्र, प्रवेश दिला जाणार नाही. कॅन्टीनची व्यवस्था व स्टॉक चेकींगसाठी मंगळवार पूर्ण दिवस व सोमवारी अर्धा दिवस कॅन्टीन बंद राहणार आहे. त्याचबरोबर एक व दोन जून रोजीही कॅन्टीन बंद असणार आहे. 

मध्यरात्रीची कृष्णकृत्ये एलसीबीने केली उघड 

महत्वाची बातमी कोरोनाला रोखण्यासाठी सातारा पालीकेचा मोठा निर्णय

ही आहेत सातारा जिल्ह्याची कोरोना लढ्यातील दोन बलस्थाने

loading image
go to top