esakal | खासदार श्रीनिवास पाटलांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांना धाडले पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार श्रीनिवास पाटलांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांना धाडले पत्र

केवळ कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणा-या कलाकारांना हालाखीच्या स्थितीचा सामना करावा लागत आहे. काही कलाकारांनी त्याबाबतची स्थिती सांगितली आहे. त्यानुसार आपण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आहेत. त्यानुसार कलावंतासाठी आर्थिक मदत देण्याची नियोजन करावे असे खासदार पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार श्रीनिवास पाटलांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांना धाडले पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे कलावंतांचा यावर्षीचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आङे. त्यामुळे संकटकाळी शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. 

खासदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झाला आहे. त्यात अनेक उद्योग धंदे बंद आहेत. व्यवसायबरोबर जत्रा, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांचे काम हिरावून घेतले गेले आहे. साधारणपणे फेब्रुवारीपासून मेअखेर पर्यंतचा कालावधी कलाकारांसाठी चांगला असतो. विविध कार्यक्रम, समारंभात कला सादर करण्याची संधी मिळते. त्यातून त्यांना योग्य मोबदला मिळून संसार चालवता येतो. त्यामध्ये ब्रासबॅंड व बॅन्जो वादक, नाटककार, तमासगीर, सनई चौघडा वादक यांच्यासह घोडेवाले, मंडपवाले, फुलवाले आदी व्यवसायिकांचा समावेश आहे. मात्र व्यवसाय ठप्प असल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. नेमक्या हंगाम काळात कोरोनाचे संकट ओढावल्याने अनेक कलावंताचे मोठे नुकसान झाले आहे. नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याने हातातील कामेही निसटली आहेत. त्यामुळे वर्षभराचे उत्पन्न मिळणारा यावर्षीचा हंगाम रिकामा गेला आहे. केवळ कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणा-या कलाकारांना हालाखीच्या स्थितीचा सामना करावा लागत आहे. काही कलाकारांनी त्याबाबतची स्थिती सांगितली आहे. त्यानुसार आपण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आहेत. त्यानुसार कलावंतासाठी आर्थिक मदत देण्याची नियोजन करावे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकुशलतेचा आपण वारसा सक्षमपणे चालवाल अशी अपेक्षा बाळगत, कलाकारांना उदरनिर्वाहासाठी व दैनंदिन गरज भागवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. निदान पुढच्या हंगामापर्यंत तेवढी आर्थिक तरतूद आपण राज्यपातळीवर करून घ्यावी अशी विनंती केली आहे.

वाद घालणाऱ्या शिक्षकांच्या होणार बदल्या

loading image
go to top