esakal | उदयनराजेंच्या "सातारा विकास'ला भाजपचा ठेंगा!
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंच्या "सातारा विकास'ला भाजपचा ठेंगा!

एक जागा आणि इच्छुक अनेक असल्याने राजकीय समतोल साधण्याची कसरत "साविआ'ला करावी लागणार आहे. सातारा विकास आघाडीचे प्रमुख उदयनराजे हे स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी कुणाला थांबवितात आणि कुणाला पुढे चाल देतात, हे येत्या काही दिवसांत समोर येणार असले, तरी निर्माण झालेल्या राजकीय सस्पेन्समुळे सातारकरांची उत्सुकता ताणली गेली आहे.

उदयनराजेंच्या "सातारा विकास'ला भाजपचा ठेंगा!

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : "जागा तुमची, उमेदवार आमचा' असे धोरण राबविण्याच्या मानसिकतेत असणाऱ्या सातारा विकास आघाडीला स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी भाजपने ठेंगा दाखवला. भाजपने स्वत:च्या कोट्यातील एक जागा स्वत:च्या ताब्यात राखत आघाडीची कोंडी केली. त्यामुळे हद्दवाढीनंतर नव्याने पालिकेत सहभागी झालेल्या भागातील राजकीय समतोल साधताना "साविआ'ला आगामी काळात कसरत करावी लागणार आहे.
 
सातारा पालिकेत "साविआ'चे दोन, नगरविकास आघाडी व भाजपचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक कार्यरत आहेत. भाजपचे नगरसेवक विकास गोसावी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्‍त झालेल्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले होते. याचदरम्यान "साविआ'तही पदाधिकारी बदलांच्या हालचाली गतिमान झाल्या. "साविआ'च्या दोन स्वीकृत नगरसेवकांपैकी फक्‍त प्रशांत आहेरराव यांचाच राजीनामा घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळू लागले. आहेरराव यांचा राजीनामा घेताना दुसरे स्वीकृत नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांचे सभागृहातील स्थान कायम ठेवण्यावर "साविआ'चे कारभारी ठाम आहेत. आहेरराव यांच्या राजीनाम्यानंतर रिक्‍त झालेल्या जागी वर्णी लागावी, यासाठी अनेक इच्छुकांनी कारभाऱ्यांना साकडे घातले आहे. स्वीकृतबरोबरच उपाध्यक्षपदीही नवीन चेहरा देण्याच्या हालचाली "साविआ'त सध्या सुरू आहेत. या पदावर नगरसेवक मनोज शेंडे यांची प्रबळ दावेदारी आहे.

भाजपच्या सुनील काळेकरांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड
 
हद्दवाढीनंतर शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्दसह इतर उपनगरे सातारा पालिकेत सहभागी झाली आहेत. शाहूपुरीत खासदार उदयनराजे भोसले यांचा गट वाढविण्याचे काम संजय पाटील यांनी, तर विलासपूर, शाहूनगर व त्रिशंकू भागात संग्राम बर्गे यांनी काम केले आहे. साताऱ्याबरोबरच नव्याने पालिकेत सहभागी झालेल्या भागातील राजकीय समतोल राखण्यासाठी "साविआ'चा भाजपच्या रिक्‍त झालेल्या एका जागेवर डोळा असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यासाठीचा प्रस्ताव दिल्याचेही पालिकेतील काही जणांकडून सांगण्यात येत होते. मात्र, तो प्रस्ताव काही न बोलता, प्रतिक्रिया न देता भाजपने अमान्य केल्याचे काल समोर आले. स्वत:च्या कोट्यातील एक जागा सुनील काळेकर यांच्या रूपाने कायम ठेवत भाजपने "साविआ'ला ठेंगा दाखवला.

जिगरबाज महाराष्ट्र पाेलिसांची हरियाणात धडाकेबाज कामगिरी 

"साविआ'त इच्छुकांची भाऊगर्दी 

एक जागा आणि इच्छुक अनेक असल्याने राजकीय समतोल साधण्याची कसरत "साविआ'ला करावी लागणार आहे. सातारा विकास आघाडीचे प्रमुख उदयनराजे हे स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी कुणाला थांबवितात आणि कुणाला पुढे चाल देतात, हे येत्या काही दिवसांत समोर येणार असले, तरी निर्माण झालेल्या राजकीय सस्पेन्समुळे सातारकरांची उत्सुकता ताणली गेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top