esakal | न विचारता शाळेतून बाहेर गेल्याने विद्यार्थ्याला शिक्षकांकडून जबर मारहाण; पाचगणीत ठाण्याचा विद्यार्थी गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

पांचगणी येथील गॉड्स व्हॅली निवासी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी बांधून जबर अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे.

न विचारता शाळेतून बाहेर गेल्याने विद्यार्थ्याला शिक्षकांकडून जबर मारहाण; पाचगणीत ठाण्याचा विद्यार्थी गंभीर जखमी

sakal_logo
By
विलास साळुंखे

भिलार (जि. सातारा) : पांचगणी (ता. महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठाच्या गॉड्स व्हॅली निवासी शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या रोहन रमेश घारे ( रा. मनोरमा नगर, ठाणे ) या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकांनी बांधून जबर अशी अमानुष मारहाण केल्याची घटना घडल्याने पांचगणी या शैक्षणिक केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पांचगणी पोलिस ठाणे व पालकांनी दिलेली माहिती अशी, की एकीकडे कोरोनामुळे सर्व ठप्प झाले असताना व वरच्या वर्गाच्या शाळा सुरू झाल्या असताना पालकांनीही नाखुशीने मुलांना वसतिगृहात पाठवले आहे. मात्र, या मुलांची काळजी घेण्याऐवजी पांचगणीमधील भारती विद्यापीठातील निवासी शाळेत वसतिगृहात असलेल्या दहावीच्या वर्गातील रोहन घारे याला त्याच शाळेतील शिक्षक प्रमोद हवालदार यांनी न विचारता शाळेतून बाहेर गेल्याबद्दल काठीने जबर मारहाण केल्याची घटना घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, साताऱ्यातील जमिनींचे वाटप करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

रोहनच्या अंगावर काठीचे व्रण उठले असून तो जखमी झाला आहे. दोन बांबू आणि स्टिकच्या सहाय्याने मला बांधून मारले असून वर्गात कोंडून ठेवले असल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले. याबाबत पालकांना समजल्यावर ते मुंबईहून पाचगणीत दाखल झाल्यानंतर रोहनला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर पांचगणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु आहे. या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.

तेजस्वीचा ताबा मला द्या अन्यथा स्नेहलला ठार मारतो; सासूला दिली धमकी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top