दिलासादायक! साताऱ्यातील 189 नागरिकांना डिस्चार्ज; 468 जणांचे नमुने तपासणीला

दिलासादायक! साताऱ्यातील 189 नागरिकांना डिस्चार्ज; 468 जणांचे नमुने तपासणीला

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 189 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 468 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 31, कराड 13, फलटण 9, कोरेगाव 19, वाई 14, खंडाळा 25, रायगाव 168, पानमळेवाडी 79, महाबळेश्वर 13, दहिवडी 12, खावली 17,  म्हसवड 15 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 53 असे एकूण 468 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने - 254476
एकूण बाधित - 51774
घरी सोडण्यात आलेले - 49523
मृत्यू - 1732
उपचारार्थ रुग्ण - 519

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com