esakal | महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण माहितीय?; प्रसिध्द अभिनेता आमिर खाननेही केली 'या' गावात पिक्चरची शुटिंग

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सह्याद्रीच्या माथ्यावर टेबललँड प्रमाणेच पाच टेकड्या आहेत. या भागालाच पाच गडांची भूमी पांचगडी व त्याचा भ्रंश होऊन 'पाचगणी' असे नांव पडले आहे.

महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण माहितीय?; प्रसिध्द अभिनेता आमिर खाननेही केली 'या' गावात पिक्चरची शुटिंग
sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : सातारा जिल्ह्याला पर्यटनाची नगरी म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात महाबळेश्वर, कास पठार, सह्याद्री पर्वतरांगा, कोयना धरण, ठोसेघर असे एक ना अनेक पर्यटन क्षेत्र लाभलेल्या जिल्ह्याची जगात वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. याच जिल्ह्यातील पाचगणी आता पर्यटनाच्यादृष्टीने उदयास येऊ लागले असून त्याची खासियत पर्यटकांना भुरळ घालताना दिसू लागली आहे.   

सह्याद्रीच्या माथ्यावर टेबललँड प्रमाणेच पाच टेकड्या आहेत. या भागालाच पाच गडांची भूमी पांचगडी व त्याचा भ्रंश होऊन 'पाचगणी' असे नांव पडले आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. थंड कोरड्या व उत्साहवर्धक हवामानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते, त्यामुळे पाचगणीला 'आरोग्य धाम' असे म्हणण्यात येते. जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या 18-20 कि. मी. अंतरावर आहे. 

हिमालयातील ही 5 ठिकाणं रहस्यमय आहेत, यातील एका ठिकाणी लोक कधीच मरत नाहीत!

महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्या-जेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे, असे संदर्भ हाती लागतात. या पाचगणाची वेगळी अशी ओळख की, येथील संपूर्ण भाग निसर्गसंपदेने नटल्याने हा परिसर नेहमीच हिरवागार असतो. हाॅटेल व्यावसायीकांच्या दृष्टीनेही या परिसराला विशेष अशी मागणी आहे. त्यामुळे येथील हाॅटेल व्यवसाय तेजीत पहायला मिळतो. 

Shimla Narkanda Tour : जर तुम्ही शिमलाला गेलात, तर नारकंडाला नक्की भेट द्या; जाणून घ्या शहराची वैशिष्ट्ये..

लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथील टेबल लॅंडवर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. प्रसिध्द अभिनेता अमिर खान याच देखील गाव असल्याची ओळख पाचगणीला मिळाली आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे, अमिरने या गावात 'तारे जमी पर' या चित्रपटाचे शुटिंग केले असून हे गाव अमिरच्या अगदी जवळचे झाल्याचे पहायला मिळते. याबरोबरच या थंड हवेच्या ठिकांनी अनेक सेलिब्रेटींनी स्वत:ची जागी खरेदी करुन आपली घरं (फार्महाऊस) याठिकाणी बांधली आहेत.  

धक्कादायक! 2050 पर्यंत जगातील चारपैकी एका व्यक्तीची श्रवणशक्ती होणार कमजोर; WHO चा महत्वपूर्ण दावा

पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर लौकिकास आले आहे. प्रेक्षणीय विविध पाईंटस, भिलार टेबललँड, किडीज पार्क आहेत. शिवाय मॉरल रिआर्मामेंट सेंटर आहे. येथे देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गुरेघर येथे मॅप्रो फ्रुट प्रॉडक्टस ही जाम फॅक्टरी ८ एकर परिसरात आहे. तेथील ग्रीन हाऊसमध्ये शेकडो प्रकारचे कॅक्टस पहायला मिळतात. त्यामुळे या पाचगणीची ओळख आपल्याला जभरात पहायले मिळेत. साताऱ्यातील महाबळेश्वरनंतर आता पाचगणी पर्यटनाच्यादृष्टीने उदयास येत असून या भागात मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांचे देखील चित्रकरण केले जात आहे. त्यामुळे हा भाग पर्यटकांना येथे येण्यासाठी भुरळ घालताना दिसत आहे.