सोशल जमान्यातही चित्रकाराचा अनोखा फंडा; महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पवारांची नोंद

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

विंग (जि. सातारा) : येथील कलाशिक्षक बाबा पवार यांच्या काव्यचित्र शुभेच्छा पत्र उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्याची दखल कऱ्हाडच्या शब्दवेध संस्थेनी घेतली आहे. त्यानिमित्त तपपूर्ती प्रकाशन सोहळा आयोजित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. 

सोशल मीडियाच्या जमान्यातही अनोख्या भेटकार्डद्वारे शुभेच्छा पत्र देण्याची परंपरा येथील चित्रकार व कलाशिक्षक पवार यांनी जोपासली आहे. सरत्या वर्षातील घडलेल्या घटनाचा ठाव ते घेतात. काव्यचित्राच्या माध्यमातून भेटकार्ड तयार करतात. घरोघरी त्याचे वाटप मित्रांना ते करतात. समाजप्रबोधनाचा संदेश ते त्यावर लिहितात. त्यांनी सन 2009 पासून सुरू केलेल्या उपक्रमाला यंदा 12 वर्षे झाली असून, त्याची तपपूर्ती झाली. या तपपूर्तीनिमित्त शुभेच्छा पत्राचा प्रकाशन सोहळा आयोजत करून त्यांचा सन्मान केला. 

कऱ्हाड अर्बन बॅंकेचे संचालक ऍड. संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. प्रसिद्ध चित्रकार दादासाहेब सुतार, महाबळेश्वरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, राजेंद्र लाटकर, ओंडच्या पंडित गोविंदपंत वल्लभ विद्यालयाच्या प्राचार्या सुलभा शिंदे, ज्योतिराम कारंजकर, आर. एम. कुंभार, कमलाकर गुरसाळे, अरुण काकडे, शरदकुमार शिंदे, ओंडच्या पंडित गोविंदपंत विद्यालयाचे कर्मचारी यांसह कला व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. श्री. मोहिते, चित्रकार श्री. सुतार, श्री. पळसे यांची मनोगते व्यक्त केली. त्रिनेत्रनाथ जोशी यांनी प्रास्ताविक केले. मानसी जोशी यांनी स्वागत केले. माधुरी कुराडे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com