कोळणेतील आंदोलन आश्‍वासनानंतर स्थगित; पाटण तालुक्‍यात पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर?

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

कोयनानगर जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील मळे, कोळणे, पाथरपुंज या तीन गावांतील जनतेने कोळणे येथील वन्यजीव विभागाच्या संरक्षक कुटीजवळ 25 जानेवारीपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन दोन महिन्यांत हा प्रश्न सोडवण्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने स्थगित करण्यात आले. 

मळे येथील 140 खातेदारांनी पाटण तालुक्‍यातील बहुले, खराडे, हणबरवाडी, गोसाईवाडी तर कोळणे येथील 79 खातेदारांनी पाटण तालुक्‍यातील बोन्द्री, मल्हारपेठ तर पाथरपुंज येथील 105 खातेदारांनी पाटण तालुक्‍यातील सोनाईचीवाडी, गांधीटेकडी व काही खातेदारांनी सांगली जिल्ह्यातील येतगाव येथे पुनर्वसनासाठी जमीन पसंत केली आहे. लवकरच या ठिकाणी त्यांचे वाजतगाजत पुनर्वसन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

मळे, कोळणे, पाथरपुंज या गावांतील 324 बाधित खातेदार असले तरी यातील 40 खातेदारांनी वन्यजीव विभागाकडे आर्थिक मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे. वन्यजीव विभाग दहा लाख रुपये आर्थिक मोबदला देत आहे. यात मळे येथील-19, कोळणे येथील- दहा, पाथरपुंज येथील-11 अशा 40 खातेदारांचा समावेश आहे. यातील कोळणे येथील आठ खातेदारांना एक लाख रुपयांचा पहिला हप्ता वन्यजीव विभागाने वर्ग केला आहे. या 40 खातेदारांमुळे 194 खातेदारांचा पुनर्वसनाचा प्रश्न शिल्लक राहणार आहे. यावेळी चांदोली अभयारण्याचे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, सदस्य बबनराव कांबळे, कोयनानगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, हेळवाक वनसंरक्षक अमित भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com