esakal | कऱ्हाडकर म्हणताहेत अन्यायकारक लॉकडाउन नकोच; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करणार पुनर्विचाराची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने मिनी लॉकडाउन घोषित केला असून यास काहीजणांनी प्रतिसाद दिला, तर काहींनी विरोध केला आहे.

कऱ्हाडकर म्हणताहेत अन्यायकारक लॉकडाउन नकोच; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करणार पुनर्विचाराची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने मिनी लॉकडाउन घोषित केला असून यास काहीजणांनी प्रतिसाद दिला आहे, तर काहींनी विरोध केला आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी येथील दक्ष कऱ्हाडकर ग्रुपने निवेदनाव्दारे केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. 

दक्ष कऱ्हाडकर संघटनेचे प्रमोद पाटील यांनी शहरातील नागरिक, व्यापारी, हातगाडे व्यावसायिक, हॉटेल संघटना, घाऊक किरकोळ विक्रेत्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने कोरोनामुळे लॉकडाउन केले आहे. मात्र, तो लॉकडाउन सामान्य नागरिक, हातगाडेधारक, किरकोळ विक्रेते, किरकोळ दुकानदार व व्यापाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकांवर लादला आहे. बंदीने नागरिकांची गैरसोय होणार आहे. कोरोना केवळ व्यापाऱ्यांमुळे होतो आहे, असा समज सरकारचा झाला आहे. मुख्यमंत्री यांनी शनिवारी, रविवारी केलेले लॉकडाउन मान्य आहे. पुढचे सलग 25 दिवसांचा बंद मान्य नाही. त्यामुळे तो निर्णय अन्यायकारक आहे.  

प्रत्येकानं Family Planning केलं असतं, तर लशीचा तुटवडा झाला नसता; खासदार उदयनराजे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत नियमांचे उल्लंघन नको; पोलिस उपअधीक्षकांचे जनतेला आवाहन

Corona Virus : बॅंडबाजा बारात, बॅंडचालक अद्याप घरात; कलाकारांना पुन्हा संसर्गझळा

Mini Lockdown : प्रशासन विरुद्ध जनता संघर्ष उफाळणार; पालकमंत्र्यांनी समन्वयाची जबाबदारी घेणे अपेक्षित

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top