esakal | Weekend Lockdown : कऱ्हाडात सन्नाटा! विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला 'पोलिसी हिसका'

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वीकेंड संचारबंदी लागू केली आहे.

Weekend Lockdown : कऱ्हाडात सन्नाटा! विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला 'पोलिसी हिसका'
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दोन दिवस लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरात काल रात्री आठ वाजल्यापासूनच सन्नाटा पसरला. पोलिसांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन लोकांना घरात बसण्याच्या केलेल्या सरकारच्या आवाहनाला शहरासह तालुक्यातील अनेक गावांनी प्रतिसाद दिला. विनाकारण शहरात फिरणाऱ्यांना पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवला. शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच शुकशुकाट होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वीकेंड संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक गावांतील आबालवृध्दांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. पोलिसांनीही शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावर तपासणी नाके उभारल्याने विनाकारण फिरणारे शहरात आलेच नाहीत. पुणे-बेंगळुर महार्गावरही आज पहिल्याएवढी वर्दळ दिसून आली नाही. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकार शेखर सिंग यांनी संचारबंदीची सक्त अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी गर्दी न करण्याचे, आवश्यक असल्यासच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. 

आंब्याच्या झाडाखाली बसून उदयनराजेंचे भीक मागो आंदोलन; Lockdown ला खासदारांचा तीव्र विरोध

त्याचबरोबर ३० एप्रिलपर्यंत आत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचेही आवाहन केले आहे. शहरासह तालुक्यात संचारबंदीची चांगलीच आंमलबजावणी झाली. अधिकारी स्वतः शहरासह तालुक्यात फिरुन परिस्थितीवर नियंत्रण ठेवत होते. शहराच्या प्रवेशव्दारावर ठिकठिकाणी पोलिसांनी तपासणी नाके केले आहेत. त्यामुळे शहरात क्वचितच वाहने येत होती. बाजारपेठेतही शुकशुकाट होता. शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी हिसका दाखवला.

मंत्री असावा तर असा! काळोखात तडफडत पडलेल्या रुग्णाला गृहराज्यमंत्र्यांचा आधार

कडक सॅल्यूट! गोडोली तलावात बुडणाऱ्या महिलेचे साताऱ्यातल्या जांबाज पोलिसांनी वाचवले प्राण

संपादन : बाळकृष्ण मधाळे