एकदम झक्कास! आता वेळेत कर भरणाऱ्यांना मिळणार 'वॉटर एटीएम कार्ड' मोफत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

वहागाव ग्रामपंचायतीच्या या योजनेचा प्रत्येक कुटुंबासाठी चांगला उपयोग होत आहे.

एकदम झक्कास! आता वेळेत कर भरणाऱ्यांना मिळणार 'वॉटर एटीएम कार्ड' मोफत

वहागाव (जि. सातारा) : ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच संग्राम पवार, उपसरपंच आनंदी पवार, ग्रामविकास अधिकारी एस. बी. घुटे व सहकऱ्यांनी ग्रामपंचायतीचा कर वेळेत भरणाऱ्यांसाठी गावच्या वॉटर एटीएममधून शुद्ध पाण्यासाठी 250 रुपयांचा रिचार्ज व 30 रुपयांचे वॉटर एटीएम कार्ड असे अंदाजित 100 दिवसांची 280 रुपये खर्चाची पाणी सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

वहागाव ग्रामपंचायतीच्या या योजनेचा प्रत्येक कुटुंबासाठी चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ही योजना जाहीर करताच गावातील 50 हून अधिक कुटुंबांनी योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना 31 मार्चंपर्यंत सुरू राहणार असून, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर वेळेत भरून ग्रामपंचायतीच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच पवार व ग्रामविकास अधिकारी घुटे यांनी केले आहे. दरम्यान, वहागाव ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे वहागाव ग्रामस्थांसह, तालुक्‍यातील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. 

Video पाहा : तुमचे वय 45 पेक्षा जादा आहे? मग जाणून घ्या लसीकरणाच्या नाेंदणीची पध्दत

दरम्यान, ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या योजनेमुळे ग्रामस्थांचाही चांगला फायदा होत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ रत्नदीप पवार यांनी केले आहे. 

पाचगणी : ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल; सत्ताधारी गटास धक्का

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top