esakal | चिंताजनक! ज्याची भीती होती तेच घडलं, कोरोनानं अखेर साताऱ्यातील दहा पोलिसांना गाठलं
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सातारा जिल्हा पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत एक अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांना त्याची बाधा झाली आहे.

चिंताजनक! ज्याची भीती होती तेच घडलं, कोरोनानं अखेर साताऱ्यातील दहा पोलिसांना गाठलं

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत एक अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांना त्याची बाधा झाली आहे. या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेत पोलिस दलाचे कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. 

काल रात्रीच्या अहवालानुसार बाधितांच्या संख्येत 703 ची भर पडली असून, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून, आज 303 जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले. सातारा शहर आणि तालुक्‍यात 129 बाधित सापडले असून, वाढणारा हा आकडा सातारकरांसाठी आगामी काळात डोकेदुखी ठरणार आहे. कऱ्हाड शहर आणि तालुक्‍यात 80, पाटण तालुक्‍यात 15, फलटण शहर आणि तालुक्‍यात 120 बाधित सापडले आहेत. 

धक्कादायक! साताऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट; 48 तासात रुग्णसंख्या चौदाशे पार

खटाव तालुक्‍यात 71, माण तालुक्‍यात 29, कोरेगाव तालुक्‍यात 54, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथे 32, तर उर्वरित लोणंद मध्ये 15, खंडाळ्यात 5, तर उर्वरित ठिकाणी 11 बाधित सापडले आहेत. वाई शहर आणि तालुक्‍यात 49, महाबळेश्‍वर शहर, तालुक्‍यात 43, जावळी तालुक्‍यात 23 सापडले आहेत. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पोलिस ठाण्याच्या पातळीवर आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्यावर पुन्हा एकदा भर देण्यात येत असून, पोलिसांचे कोरोना केअर सेंटर आज पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात आले. 

कऱ्हाड, मलकापूरची डेंजरझोनच्या दिशेने वाटचाल?; बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top